पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – अद्यापही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर ग्राहकांना स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. कारण Samsung ने मार्चमध्ये आपला मिड-रेंज 5G स्मार्टफोन Samsung Galaxy F23 5G लॉन्च केला. विशेष म्हणजे हा फोन फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटवर विकला जात आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
Samsung Galaxy F23 दोन स्टोरेज प्रकारांमध्ये येतो – 4GB RAM + 128GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज. लॉन्चच्या वेळी, बेस व्हेरिएंटची किंमत 17,499 रुपये होती आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 18,499 रुपये होती. तथापि, हे दोन्ही प्रकार फ्लिपकार्टवर अनुक्रमे 13,999 आणि 14,999 रुपयांना विकले जात आहेत. म्हणजेच एकूण 3500 रुपयांची सूट दिली जात आहे. इतकेच नाही तर ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि SBI क्रेडिट कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील आहे.
Samsung Galaxy F23 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा FHD+ इन्फिनिटी U-डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 5 आहे. यात स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसरसह 6 GB पर्यंत रॅम मिळते, यासह 6 GB व्हर्च्युअल रॅमचा पर्याय देखील आहे. म्हणजेच एकूण RAM 12 GB होईल. त्याची स्टोरेज 128 GB आहे. कंपनीने आश्वासन दिले आहे की या फोनला दोन वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि चार वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.
यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरासह 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि क्लोज-अप शॉट्ससाठी 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच 10x झूम पर्यायासह येतो. पुढील बाजूस सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 13MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी असून ती 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.