मुंबई – सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल अॅप वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कंपनीने एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे त्याची दखल घेणे आवश्यक आहे. सध्या सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल वापरकर्त्यांना त्यांचे फोटो सॅमसंग ऑनलाइन, कंपनीच्या क्लाउड स्टोरेजवरून स्थलांतरित करण्यासाठी सध्या सूचना मिळत आहेत. याशिवाय, कंपनीने एक निवेदन जारी करून अॅप वापरकर्त्यांना त्यांचे फोटो क्लाउड स्टोरेजमधून हटवण्याची विनंती केली आहे.
वापरकर्त्याने पालन केले नाही, तर ठराविक कालावधीनंतर फोटो नष्ट केले जातील, असेही स्पष्ट केले आहे.
खरे म्हणजे, सदर कंपनीने यापूर्वी एक निवेदन जारी केले होते आणि त्यात म्हटले होते की, दि. 30 सप्टेंबर 2021 पासून गॅलरी सिंक आणि माय फाइल्ससाठी ड्राइव्ह स्टोरेज सॅमसंग क्लाउडद्वारे जाईंट किंवा संलग्न राहणार नाही, तसेच तुमचा डेटा देखील हटवला जाईल. त्याशिवाय तुमच्याकडे प्रीमियम स्टोरेज सबस्क्रिप्शन प्लॅन असल्यास, दि. 1 ऑक्टोबर 2021 पासून आपोआप रद्द केले जाईल आणि त्याचा तुम्हाला परतावा जारी केला जाऊ शकतो.
वास्तविक सॅमसंगच्या क्लाउड स्टोरेजमध्ये संपर्क, कॅलेंडर आणि फोटोंचा बॅक अप घेतला जातो. तसेच कंपनीने इमेज क्लाउड स्टोरेजचा पुरवठा करण्याची निवड रद्द केली आहे आणि अॅप वापरकर्त्यांना क्लाउडवर सेव्ह केलेली कोणतीही प्रतिमा हटवण्यापूर्वी डाउनलोड करण्यास सांगितले आहे. तथापि, वापरकर्ते त्यांच्या डेटाचा बॅकअप घेणे आणि समक्रमित करणे तसेच संपर्क, कॅलेंडर आणि नोट्स रिस्टोर (पुनर्संचयित ) करणे सुरू ठेवू शकतात.
अॅप वापरकर्त्यांना त्यांचे फोटो मायक्रोसॉफ्ट वनड्राईव्हवर स्थलांतरित करण्यास किंवा ते सर्व त्यांच्या स्थानिक स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर डाउनलोड करण्यासाठी सूचित केले जात आहे. अंतिम मुदतीपूर्वीच, डेटा डाउनलोड केल्याने सॅमसंग क्लाउड स्टोरेज संपुष्टात येऊ शकते. गॅलरी सिंक, ड्राइव्ह आणि प्रीमियम स्टोरेज सबस्क्रिप्शन ही वैशिष्ट्ये देखील बंद केली जातील.
अॅप वापरकर्ता डिव्हाइसच्या गॅलरीमधून स्वयंचलित डेटा ट्रान्सफर सपोर्टशिवाय OneDrive द्वारे सॅमसंग क्लाउडला लिंक करू शकतो. तसेच अॅप वापरकर्ते त्यांची गॅलरी डाउनलोड करू शकतील. त्याचप्रमाणे सॅमसंग क्लाउडमधील डेटा त्यांच्या वैयक्तिक स्टोरेजमध्ये संग्रहित करू शकतील. आपण हा पर्याय निवडल्यास, OneDrive एकत्रीकरण उपलब्ध होणार नाही. तसेच, स्थानिक स्टोरेजमध्ये डाउनलोड करण्याचा पर्याय केवळ काही दिवसांपर्यंत उपलब्ध असेल.