मुंबई – सध्याच्या काळात प्रत्येकालाच अत्याधुनिक स्मार्टफोन हवा असतो. समसंगने गॅलेक्सी A22 हा नवा स्मार्टफोन भारतात आणला आणि अल्पावधीत तो लोकप्रिय झाला आहे. सॅमसंग गॅलेक्सी A22 स्मार्टफोनला मागच्या बाजूस ४ कॅमेरे देण्यात आले असून ते वॉटरड्रॉप-स्टाईल डिस्प्लेसह आहेत.
गॅलेक्सी A 22 स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला युरोपमध्ये लॉन्च करण्यात आला होता. स्मार्टफोन एमोलेड डिस्प्ले आणि 15 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी A22 स्मार्टफोनची किंमत १८ हजार ४९९ रुपये आहे. हा फोन फक्त ६GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजसह उपलब्ध आहे.
गॅलेक्सी A22 हा 5G फोन आहे. स्मार्टफोन एमोलेड डिस्प्ले आणि 15w फास्ट चार्जिंग सपोर्टसह आला आहे. तसेच
सॅमसंग गॅलेक्सी ए 22 सॅमसंग इंडिया वेबसाइटच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए 22 स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन ७२० एक्स १६०० पिक्सल आहे. हा स्मार्टफोन ६ जीबी रॅमसह देण्यात आला आहे. या फोनमध्ये अंतर्गत स्टोरेज 128 जीबी आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे फोनची स्टोरेज १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.
सॅमसंग गॅलेक्सी ए 22 च्या मागील भागात क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड एंगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा खोलीचा सेन्सर देण्यात आला आहे. या सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर १३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.