मुंबई – सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G फोन लवकरच दिसणार आहे. Samsung Galaxy A22 5G शुक्रवारी (२३ जुलै) लाँच होत आहे. कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक टिझर पोस्ट करून फोनची लाँचिंगची तारीख जाहीर करण्यात आली आहे. लॅग फ्री, रियर टाइम गेमिंग 5G हा फोन ११ बँड 5G ला सपोर्ट करेल, असा दावा कंपनीने केला आहे.
किंमत
भारतात पहिल्यांदाच Samsung Galaxy A22 फोन लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या 5G व्हेरिएंटला युरोपात लाँच करण्यात आले आहे. Samsung Galaxy A22 5G च्या बेस व्हेरिएंटला वीस हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केले जाऊ शकते. फोनला दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केले जाऊ शकते.
संभाव्य तपशील
Samsung Galaxy A22 5G स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाची FHD+LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ९० एचझेड रिफ्रेश किंमतीत सादर केला जाऊ शकतो. ८०० nits चे पिक स्क्रिन ब्राइटनेस दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेला देण्यात आला आहे. त्याचा मेन कॅमेरा ४८ एमपीचा असेल. त्याशिवाय ५ एमपी अल्ट्रा वाइड लेंस आणि २ एमपी डेफ्थ सेंसरचा सपोर्ट दिला जाणार आहे. सेल्फीसाठी फोनच्या समोरच्या पॅनलवर ८ एमपीचा कॅमेरा मिळणार आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी असेल. १५W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज केला जाईल.