सेऊल (दक्षिण कोरीया) – गेल्या वर्षी सॅमसंगचे संस्थापक चेअरमन ली कुन ही यांच्या निधनानंतर आता वारसा कर भरण्यासाठी यांच्या कुटुंबाने त्यांच्या संग्रही असलेल्या प्रसिद्ध चित्रकार पिकासो आणि डॅलिस यांच्यासह हजारो दुर्मिळ कलाकृतीचे तसेच वैद्यकीय संशोधनासाठी कोट्यवधी डॉलर्सच्या निधीचे दान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सॅमसंग कंपनीने सांगितले की, ली यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि तीन मुले आहेत आणि त्यांना वारसा कर म्हणून १०.८ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागेल. ही रक्कम गेल्या वर्षी दक्षिण कोरियाच्या एकूण संपत्ती कराच्या तिप्पट आहे.
ली कुटुंबाने पुढील पाच वर्षांत ही रक्कम सहा हप्त्यांमध्ये देण्याची योजना आखली होती आणि या महिन्यात पहिला हप्ताही भरला होता. सॅमसंगच्या व्यवसायावरील नियंत्रण वाढविण्यासाठी ली कुटुंबाला कर भरणे आवश्यक आहे.
काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या प्रक्रियेमुळे एक नियम तयार होऊ शकेल. या प्रकरणात, मालमत्तेचा मोठा भाग दान केल्यास देय देणे सुलभ होईल, कारण दान केलेल्या कलाकृतींवर कर देण्याची गरज भासणार नाही.