सिओल – आघाडीची इलेक्ट्रॉनिक कंपनी एलजी लवकरच आयफोनची विक्री करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्टपासून एलजी आपल्या दक्षिण कोरियातील काही स्टोअर्समधून या मोबाईलच्या विक्रीस सुरू करेल. आयफोन सोबतच ऍप्पलची अन्य उत्पादनेही येथे विक्रीसाठी ठेवली जाऊ शकतात. एल जी च्या या निर्णयामुळे मोबाईल फोनमधील आघाडीची कंपनी सॅमसंगसाठी स्पर्धा निर्माण होणार आहे. दरम्यान, एलजी ने याच वर्षी एप्रिलमध्ये स्मार्टफोनच्या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. एलजी प्रमाणेच सॅमसंग ही देखील कोरियन कंपनी असून दक्षिण कोरियातील स्मार्टफोन मार्केटमध्ये त्याचा मोठा हिस्सा आहे. त्यामुळेच ऍप्पलला एल जी चे सहकार्य मिळाल्याने सॅमसंगच्या अडचणी वाढू शकतात.
एलजी आणि अॅप्पलच्या भागीदारीला विरोध
एलजीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, एलजी ने ऍप्पलचे फोन विकाण्यास स्थानिक वितरकांचा विरोध होता. अँटी कॉम्पिटीटीव्ह करारांतर्गत एलजी ची ही भूमिका चुकीची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एलजी च्या या निर्णयामुळे एलजी आणि सॅमसंगमध्ये स्पर्धा वाढेल. या स्पर्धेमुळे स्मार्ट फोनची विक्री वाढावी, यासाठी प्रयत्न होतील. आणि शेवटी हेल्दी कॉम्पिटीशनचे जे काही वातावरण आहे, ते खराब होण्याची भीती आहे. मात्र, याबाबत सूचना देऊनही एलजी ने आपला निर्णय बदललेला दिसत नाही.
एलजीच्या ४०० स्टोअर्समधून आयफोनची विक्री
एलजीने नुकतेच आयफोन, आय पॅड्स आणि ऍप्पलच्या लाईफकेअर प्रॉडक्ट्सचे स्पेशल प्रमोशन सुरू केले. याअंतर्गत एलजीने आपल्या ग्रुपमधील कर्मचाऱ्यांना ऑनलाईन शॉपिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. एखाद्या स्मार्टफोन कंपनीने दुसऱ्या कंपनीचे स्मार्टफोन घेण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना संधी देणे, अशी ही पहिलीच वेळ असावी. सध्या एलजी ची दक्षिण कोरियात ४०० स्टोअर्स आहेत. यातूनच एल जी स्मार्टफोन्सची विक्री वाढणार आहे.