मुंबई – दोन दिवसातच नवीन वर्ष वर्ष 2022चा प्रारंभ होणार आहे. यासाठी अनेक नागरिक वेगवेगळे संकल्प करतात. तसेच नवीन वर्षासाठी स्वतःकरिता तसेच आपल्या प्रियजनांसाठी नातेवाईक आणि कुटुंबासाठी वेगळ्या आणि आकर्षक वस्तू खरेदी करण्याचा देखील विचार करतात. आपण देखील अशाप्रकारे स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याकरिता सॅमसंगने आकर्षक असे मॉडेल बाजारात आणले आहे, नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे.
सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy M52 5G ची किंमत 2,500 रुपयांनी कमी केली आहे, हा फोन या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च झाला होती. किंमतीतील कपातीनंतर फोनच्या 6 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेजमध्ये याची किंमत 27,499 रुपये आहे. त्याच वेळी, आता या फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला फोन आपण 29,499 रुपयांना खरेदी करू शकता. या कंपनीचा हा स्मार्टफोन ब्लेझिंग ब्लू आणि आइसी ब्लू कलर पर्यायांमध्ये येतो.
सॅमसंग स्मार्टफोन Galaxy M52 हा फोन Amazon India वरून खरेदी केल्यास तुम्हाला 3 हजार रुपयांची त्वरीत सूटही मिळेल. मात्र सवलतीसाठी फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला ICICI बँकेचे कार्ड वापरावे लागेल.
सॅमसंग Galaxy M52 5G ची काही खास वैशिष्ट्ये आहेत. या फोनमध्ये, कंपनी 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच फुल एचडी + सुपर AMOLED प्लस डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 20:9 च्या आस्पेक्ट रेशो आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन रियर कॅमेरे मिळतील. यात 64 मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आणि 5 मेगापिक्सेलचा दुय्यम सेन्सरसह 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ आवृत्ती 5, GPS/A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट मिळेल.