इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
समृध्दी महामार्गावरील ब्रिजवर मोठ्या प्रमाणात खिळे ठोकल्यामुळे नागपूरकडून मुंबईकडे जाणा-या अनेक गाड्या पंचर झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता कंत्राटदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनीच दिलेल्या दौलताबाद पोलीस ठाण्यात कंत्राटदार मेघा इंजीनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सत्यनारायण यांच्यावर बेजबाबदारपणा दाखवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल. हे खिळे नसून भेगा बुजविण्यासाठी केमिकल सोडणारे ॲल्युमिनियमचे नोझल असल्याचा खुलासा करण्यात आला होता. मात्र यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले, अनेकांना धोका निर्माण झाला, त्यामुळे कंत्राटदाराने आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हा प्रकार घडल्यानंतर कंपनीने हे खिळे नसून भेगा बुजविण्यासाठी केमिकल सोडणारे नोझल असल्याचा खुलासा केला होता. पण, या नोझलमुळे अनेक गाड्या का पंचर झाल्या म्हणून गाड्यांच रीघ लागली होती. गाड्या पंचर झाल्यानंतर वाहकांच्या गाड्या थांबल्या. त्यानंतर त्यांनी या ब्रिजवर खिळे ठोकल्याचे म्हटले होते. प्रथमदर्शनी लोकांना हे खिळे चोरट्यांनी ठोकले असावे असे वाटले. पण, प्रत्यक्षात हे खिळे रस्त्याचे काम करणा-या कंपनीने लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे हे खिळे लावल्यानंतर कोणतेही बॅरिंगेटिंग येथे केलेले नव्हते. त्यामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला. गाड्या पंचर झाल्याची घटना समोर आल्यानंतर रात्रीतून हे खिळे काढण्यात आले असाही आरोप वाहनधारकांनी केला होता.
समृध्दी महामार्गावर एकीकडे अपघातांचे मोठे प्रमाण असतांना हा प्रकार गंभीर होता. यामुळे मोठी दर्घटना सुध्दा होऊ शकली असती. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.