मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातत्याने घडत असलेल्या अपघातांमुळे समृध्दी महामार्ग सुरुवातीपासून चर्चेत राहिला आहे. येथील असुविधांबाबत सातत्याने बोलल्या गेले आहे. अशात एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी समृध्दी महामार्गावरच्या गंभीर अपघातांची मालिका थांबताना दिसत नाही . सातत्याने अपघात होत असलेल्या नागपूर मुंबई समृध्दी महामार्गावर वाहतुकीला परवानगी देण्यापूर्वी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच सुरक्षिततेच्या समस्यांचे निराकरण होईपर्यंत महामार्गावरून वाहतूक तात्पुरती थांबवण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अनिल वडपल्लीवार यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली.
तज्ज्ञ पॅनलची स्थापना, चिन्हे, वाहन तपासणी, प्रथमोपचार क्लिनिकची स्थापनेसह विविध उपाय याचिकेत सुचवले. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी राज्य सरकार आणि एमएसआरडीसीला नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. महामार्गावर अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि असुविधा होत असल्याचे अनिल वडपल्लीवार यांचे म्हणणे आहे. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातात निष्पाप लोकांचा मृत्यू आणि सुविधांच्या अभावामुळे होणाऱ्या अपघातांबद्दल न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली.
समृध्दी महामार्गाच्या बाजूला हिरवळ नसल्याने रस्ता संमोहन आणि आयआरसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनिवार्य असलेल्या इतर सुरक्षा निकषांची पूर्तता न केल्यामुळे अपघात होतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सोबतच समृद्धी महामार्गावर मधून प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांची मद्य प्राशन केल्याबाबतची तपासणी, वाहनाची तपासणी, चाकांचा दर्जा, हवा आणि अन्य बाबी तपासल्या जात नाहीत. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याचा दावा वडपल्लीवार यांनी केला आहे.
ठरतोय मृत्यूचा सापळा
समृध्दी महामार्ग राज्याच्या विदर्भ भागाला राजधानी मुंबईला जोडण्यासाठी असलेला महत्त्वकांक्षी महामार्ग आहे. जवळपास साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा म्हणून या महामार्गाची ओळख व्हायला लागली आहे. नागपूर ते मुंबई असा ७०१ किलोमीटरचा सरळसोट असलेला हा महामार्ग आहे. आतापर्यंत या महामार्गावर जवळपास हजारच्यावर अपघात झाले आहेत. त्यात गंभीर अपघातात ३६८, चालकाला डुलकी लागल्याने १८३, टायर फुटून ५१, तांत्रिक कारणांमुळे २२हून अधिक जणांचे जीव गेले आहेत.
Reply regarding inconveniences on Samrudhi Highway, High Court notice to Govt
Samrudhi Highway Mumbai High Court notice State Government
Facilities Services Common Mahamarg Nagpur Travel Petition Hearing MSRDC