मंगळवार, नोव्हेंबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

समृद्धी महामार्ग : दररोज धावताय एवढी वाहने; सुरक्षेसाठी या आहेत उपाययोजना आणि सुविधा

डिसेंबर 19, 2022 | 12:59 pm
in राज्य
0
Samruddhi Highway 2

 

औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान यांचे हस्ते संपन्न झाला. त्यानंतर हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरुन दररोज सरासरी १० ते १२ हजार वाहने प्रवास करत आहेत व दिवसेंदिवस ही संख्या वाढत जाणार आहे. महामार्गावरुन प्रवास करतांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील उपाय योजना केलेल्या असल्याची माहिती औरंगाबाद येथील म.रा.र.वि. महामंडळाचे मुख्य अभियंता बी.पी. साळुंके यांनी दिली.

२१ ठिकाणी शीघ्र प्रतिसाद वाहने
- अपघातग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी इंटरचेंजवर २१ ठिकाणी सुसज्ज शीघ्र प्रतिसाद वाहने – QRV वाहने
उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
- अपघातग्रस्त वाहन द्रुतगती मार्गावरुन बाजूला नेण्यासाठी १३ ठिकाणी क्रेनची सोय केलेली आहे.
- अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण १५ रुग्ण वाहिका आहेत. रुग्णवाहिका स्थानिक रुग्णालयांशी संलग्न
ठेवण्यात आलेल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरिता १०८ क्रमांकावर संपर्क साधता
येतो.
- सुरक्षेसाठी महामार्ग सुरक्षा पोलीस (Highway Safety Police) तैनात आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य
सुरक्षा महामंडळाचे (MSSC) एकूण १२१ सुरक्षा रक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त
केलेले आहेत.

अपघात झाल्यास हेल्पलाईन
- वाहनांचा बिघाड / अपघात झाल्यास २४ तास हेल्पलाईन क्रमांक 1800 233 2 233/ 81 81 81 81
५५ कार्यरत असून सदर हेल्पलाईन क्रमांक महामार्गावर ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.
प्रवासाला निघण्यापुर्वी आपल्या मोबाइल मध्ये सदर क्रमांक कृपया जतन करावेत.
- नागपूर ते शिर्डी दरम्यान समृद्धी महामार्गावर प्रत्येक इंटरचेंजच्या ठिकाणी स्वंतत्र नियंत्रण प्रणाली असून ते
मुख्य नियंत्रण कक्षाशी संलग्न आहेत. औरंगाबादमधील सांवगी इंटरचेंज येथे मुख्य नियंत्रण कक्ष स्थापित
करण्यात आलेला असून नियंत्रण कक्षातून २४ तास सर्व सुविधा यंत्रणावर बारकाईने लक्ष दिले जाते.

महामार्गावर या सुविधाही
- नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७ ठिकाणी तर शिर्डीहुन नागपूरच्या दिशेने जातांना ६ ठिकाणी अशा एकूण १३
ठिकाणी इंधन भरण्यासाठी पेट्रोल-डिझेल पंपची सोय करण्यात आली आहे. याच ठिकाणी प्रसाधनगृह,
खानपान सेवा, टायर पंक्चर काढण्यासाठी व टायरमध्ये हवा भरण्यासाठी व वाहनांची किरकोळ दुरुस्तीची
सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पथकर स्थानकांवर देखील प्रसाधन गृहांची सुविधा उपलब्ध आहे.
- याशिवाय १६ ठिकाणी महामार्ग सोयी सुविधा (Way side Amenities) सुरु करण्याची प्रक्रिया सुरु
असून लवकरच प्रवाशांसाठी ती उपलब्ध करुन दिली जाईल.

वाहनधारकांनो इकडे लक्ष द्या
- सुरक्षित प्रवासासाठी वाहन चालकांनी खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे :-
अतिवेगामुळे काही ठिकाणी अपघात झालेले असून, त्याअनुषंगाने सर्व जनतेस व वाहनधारकांना आवाहन व
विनंती करण्यात येते की,
i. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाचे इंजिन, इलेक्ट्रीक वायरिंग, टायर्स इ. सुस्थितीत असण्याची खात्री
करावी.
ii. वाहनाची गती विहित मर्यादित ठेवावी व लेनची शिस्त पाळावी.
iii. चूकीच्या बाजूने वाहने ओव्हरटेक करु नये.
iv. मुख्य मार्गिकेवर वाहने पार्क करु नये.
v. दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
vi. सीट बेल्ट वापरणे इ. बाबींचे जाणीवपूर्वक व काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक आहे.

Samruddhi Highway Daily Vehicles and Safety Features
Mahamarga Nagpur Shirdi Accident Precaution

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कर्नाटक विधीमंडळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चित्र लावल्याने मोठा गदारोळ

Next Post

तान्ह्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे विधिमंडळात; चर्चा तर होणारच

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
20221219 130022 e1671435683689

तान्ह्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे विधिमंडळात; चर्चा तर होणारच

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011