मनमाड ,चांदवड– चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्यश्रम संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष संपतलालजी उर्फ संतोषचंद सुराणा (९३) यांचे संथारा व्रतात मरण प्राप्त झाले . ते मनमाड शहरातील प्रसिद्ध उद्योगपती होते. त्यांच्या पश्चात पोपटलाल, शंशीकांत, अजितकुमार मुले, नातू पंतू असा परिवार आहे. तसेच श्री .नेमिनाथ जैन ब्रम्हचार्याश्रम संस्थेचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा यांचे ते वडील होत. आज सकाळी संपतलाल सुराणा यांचा पार्थिव चांदवड येथील श्री .नेमिनाथ जैन संस्थेच्या आवारात अधिकारी प्राध्यापक शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवला होता. सुराणा यांच्या निधनाने एसएनजे बी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.