सातारा – केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील कोविड-19 अंतर्गत लसीकरण सुरु करण्यात आले असून सातारा जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व लोकांना कोविड-19 चे मोफत लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने दि. 16 एप्रिल 2021 रोजी प्राथमिक आरोगय केंद्र, रेठरे बु, ता. कराड येथे श्री. संपत राजाराम जाधव (वय-59 वर्षे) यांना लसीकरणानंतर 20 मिनीटांनी डोकेदुखी होऊन चक्कर आली. काविड-19 लसीकरणा अंतर्गत उद्भवणाऱ्या परिस्थितीत देण्यात येणारे औषोधपचार श्री. जाधव यांना तिथल्या वैद्यकीय अधिकारी यांनी केले व त्यांना तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेने कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी संदर्भीत केले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
यानंतर उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे त्याचे तज्ञ समिती मार्फत शवविच्छेदन करण्यातआले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार श्री. जाधव यांचा मृत्यु हा Left Ventricular Hipertropy & Atherosclerosis या आजाराने झाल्याचे निष्पन्न झाले. सदर मृत्यु कोविड-19 लसीकरणा संबंधित नसल्याचे निर्दशनास आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, रेठरे बु, ता. कराड येथे दि. 16 एप्रिल 2021 रोजी एकूण 220 लाभार्थ्यांना कोविड-19 चे लसीकरण करण्यात आले. यामध्ये इतर कोणत्याही लाभार्थींना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. याबाबत आरोग्य विभागाकडील माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी भेट देऊन सर्व बाबींची पडताळणी केली.
जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत असणारे ए ई एफ आय (लसीकरणानंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंत समिती) मृत्युचे कारण शोधण्यासाठी या प्रकरणाचे मुल्याकर करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
” केंद्र व राज्य शासनाच्या नविन मार्गदर्शक सुचनेनुसार 45 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना कोविड-19 चे लसीकरण करण्यात येत आहे. सदर लसीकरणामुळे कोणताही धोका नाही. तरी सदर लसीकरणाचा लाभ 45 वर्षावरील सर्वांनी घ्यावा. “
— विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी
” प्राथमिक आरोगय केंद्र, रेठरे बु, ता. कराड येथे श्री. जाधव यांचा झालेला मृत्यु हा कोविड-19 च्या लसीकरणामुळे झालेला नाही. तरी 45 वर्षावरील लाभार्यिांनी लसीकरण करुन घ्यावे. “
– डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी