नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलन, नाशिक येथे सोमवार दिनांक २९ ते बुधवार ३१ ऑगस्ट असे तीन दिवस श्री चक्रधरनगर डोंगरे वस्तीगृह मैदान, गंगापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात तीन दिवस विविध धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला.
दरम्यान सोमवार २९ ऑगस्ट रोजी पहाटे ५ भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरणांकित स्थानास मंगल स्नान, वस्त्र समर्पण, विडा अवसर, श्रीमद् भगवद्गीता पाठ पारायण, आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर सकाळी ९ वाजता ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले याप्रसंगी सकाळी ध्वजवंदन प.पू.प.म. श्री. जामोदेकर बाबा यांच्या हस्ते झाले. यावेळी महानुभाव पंथातील अनेक संत महंत, तसेच प्रमुख राजकीय, सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि भाविक माता-भगिनी तपस्विनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सभा मंडपाचे उद्घाटन प.पू.प.म. श्री. डॉ. बाबासाहेब बिडकर यांच्या हस्ते झाले. सकाळी दहा वाजता धर्मसभेला प्रारंभ झाला. याप्रसंगीया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पू.प.म. श्री. डॉ. बाबासाहेब बिडकर (मेरठ , उत्तर प्रदेश ) होते. तर व्यासपीठावर त.पू.प.म. श्री. रुक्मिणीबाईजी पंजाबी (आलेगाव, अकोला ), प.पू.प.म. श्री. साळकर (धुळे ),प.पू.प.म. श्री. जामोदेकर बाबा (गाजियाबाद उत्तर प्रदेश ),प.पू.प.म. श्री. भोजने बाबा, ( सेलू परभणी ), प.पू.प.म. श्री. सुकेणेकर बाबा ( सुकेणे ),प.पू.प.म. श्री. पुजदेकर बाबा ( घोटी ) सेंगराज दादा सातारकर (सातारा ),प.पू.प.म. श्री. मचाले बाबा (सिंगमपल्ली तेलंगणा ), प.पू.प.म. श्री.सागर मुनी पुणेकर (पुणे ) आदींसह देशभरातील तसेच राज्यातील व जिल्ह्यातील संत महंत व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत म्हणतात ही प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानवरून प.पू.प.म. श्री. डॉ. बाबासाहेब बिडकर (मेरठ , उत्तर प्रदेश )यांनी आपल्या प्रबोधन पर भाषणात विचार मांडताना सांगितले की, सुमारे ८०० वर्षापूर्वी श्री भगवान श्री चक्रधर स्वामी मांडलेले तत्त्वज्ञान आणि विचार आजच्या काळातही विचार अत्यंत मोलाचे ठरणारे आहेत. वास्तविक पाहता या महानुभाव पंथाच्या विचारांची सुरुवात आज जितक्या मोठ्या प्रमाणावर झाली, ती सुमारे ५००ते ६०० वर्षांपूर्वीच करायला हवी होती. म्हणजे धर्मप्रचाराची शृंखला कायम राहिली असती. परंतु उशीर झाला तरी हरकत नाही, ईश्वराची सेवा ही प्रत्येकानेच केले पाहिजे, जीवनात संस्काराचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या पिढीवर संस्कार करण्याची गरज असून आपल्या धर्मपंथाला केवळ महाराष्ट्र किंवा भारत देशापुरते मर्यादित न ठेवता तो संपूर्ण जगात या धर्म पंथाचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा, असेही स्पष्ट प्रतिपादन डॉ. बिडकर बाबा यांनी केले,
यावेळी त्यांनी सांगितले की, आपल्या महानुभाव पंथाचे महाराष्ट्रात अनेक मठ मंदिरे आणि तीर्थस्थाने आहेत, तसेच गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश यासह उत्तर भारतात आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा दक्षिण भारतात देखील महानुभाव पंथाची मत मंदिरे आहेत परंतु परदेशात केवळ अमेरिकेत एक आणि नेपाळमध्ये एकच मंदिर आहे त्यामुळे आपल्या पंथाची जगभरात मठ, मंदिरे व्हावीत, यासाठी प्रयत्न करायला हवेत असेही त्यांनी सांगितले. आपल्या पंथाचा नव्या पिढीने सेवाभाव वृत्तीने प्रचार आणि प्रसार करावा. आजच्या काळात आम्ही आमच्या संस्कृतीसाठी काय करतो ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. स्वतःसाठी कोणीही विचार करतो, परंतु दुसऱ्याबद्दल विचार करण्याची गरज आहे आजच्या काळात ज्ञानाला महत्त्व असून ज्ञानापेक्षा अनुभूती आणि अनुभव महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावरील अनेक मान्यवर संत महंतांनी देखील आपले विचार मांडले.
यावेळी तपस्वीनी रुक्मिणाबाई पंजाबी म्हणाल्या, महानुभाव पंथाचे हजारो ग्रंथ असून, त्यांपैकी बहुतांश ग्रंथ मराठीतच आहेत. त्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष करू नका. या पंथाने कोणत्याही भाषेची घृणा केली नाही. घृणा ही माणसांची, भाषांची नव्हे, तर दोषांची करायला हवी. हे दोष आपल्यातून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पुजदेकर बाबा यांनी सांगितले की, या संप्रदायाने अनेक भेद बाजूला सारून मानवतेला महत्त्व दिले. श्री चक्रधर स्वामींचा मानवतेचा संदेश प्रत्येकाने आचरणात आणायला हवा. साळकर बाबा म्हणाले, कलियुगात संघटनेची शक्ती महत्त्वाची आहे. आपण संघटित नसल्याने श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सव शासनस्तरावर साजरा होऊ शकला नाही. मात्र, नाशिकमध्ये त्याची उणीव भरून काढण्यात आली. पंथात लेखक तयार
होऊन त्यांची पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवायला हवीत.
यावेळी दिनकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. महानुभाव पंथाच्या मागण्या शासन दरबारी मांडून त्यांचा पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. याबाबत संमेलनात ठराव केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. महंत चिरडे बाबा यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, दुपारी बारा वाजता भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा जन्मोत्सव अत्यंत धार्मिक वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला, या निमित्त पुष्पवृष्टी करण्यात येऊन आरती तसेच श्री स्वामींच्या नावाचा तसेच पंचकृष्ण अवताराचा जयघोष करण्यात आला. तसेच देवास विडा अवसर वाहून पंच अवतार उपहार दाखविण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे मार्गदर्शक – प. म. श्री. सुकेणेकर बाबा , प. म. श्री. चिरडे बाबा, म. श्री. कृष्णराज बाबा मराठे तसेच आयोजक व स्वागतोत्सुक – मा. आमदार बाळासाहेब सानप, मा. श्री. दिनकर अण्णा पाटील, मा. श्री. दत्ता नाना गायकवाड, मा. श्री. प्रकाश शेठ घुगे ( सचिव ), मा. श्री. प्रकाश शेठ ननावरे (खजिनदार ), प्रभाकर आप्पा भोजने, मा. श्री अरुण महानुभव मा. श्री. विश्वास का. नागरे श्री छबू नागरे आदी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संत महानतांचे पुष्पहार घालून स्वागत व सत्कार करण्यात आला.
तसेच स्वागत समिती- मा. श्री. लक्ष्मणराव जायभावे. मा. श्री. भास्करराव गावित, मा. श्री. उदयभाऊ सांगळे, मा. श्री. सिताराम पाटील आंधळे, मा. श्री. अरुण सोनूपंत भोजने, मा. श्री. राजेंद्र जायभावे. मा श्री संजय सोनुपंत भोजने, मा. श्री. भास्करराव सोनवणे, मा. श्री. सागर शांतीलाल जैन, योगेश मस्के, नंदू हांडे, किरण वसंत मते, सुरेश भाऊ डोळसे, अनिल जाधव, श्याम राजाराम कातोरे, प्रदीप वैद्य, मुकुंद बाविस्कर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, उद्या या संमेलनात धर्मसभा, संत महंतांची मिरवणूक व शोभायात्रा, भजन, कीर्तन, कथाकथन, प्राचीन, काव्यवाचन, कवी संमेलन व स्वामींच्या तत्त्वज्ञानावर चर्चा आणि मार्गदर्शनाचे आयोजन केलेले आहे. या संमेलनास संपूर्ण देशभरातून संत, महंत, भिक्षुक, वासनिक, साहित्यिक, लेखक, कवी व साधक वृंद उपस्थित राहणार आहेत.
महानुभाव पंथातील आचार्य गणांची तसेच त्यांच्या जेवणाच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी सभा व मंडपाच्या शेजारीच विशेष मंडप उभारण्यात आला असून तेथे रात्रंदिवस भोजन कक्षात वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचे काम सुरू आहे. महाप्रसाद म्हणून बुंदी, शिरा, पुलाव यासारख्या मिष्ठान्नचा प्रसाद देण्यात येत आहे. दानशूर व्यक्ती आपापल्या परीने या भोजन व्यवस्थेसाठी मदत करत आहेत, तर दुसरीकडे मुख्य मंडपात स्टेजवर संत, महंतांची असं व्यवस्था करण्यात येत असून याच ठिकाणी एक देवाचे मंदिर तथा देवपूजा साकारण्यात आली आहे.
या संमेलनानिमित्त विविध धार्मिक वस्तूंचे स्टॉल तसेच धार्मिक पुस्तकांचे स्टॉल आणि पूजेच्या साहित्याची दुकाने देखील थाटण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे या संमेलनासाठी केवळ राज्यातून नव्हे तर देशभरातून महानुभाव पंथाचे अनेक संत, महंत, वासनिक, उपस्थित आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था शहरातील विविध लॉन्स मध्ये करण्यात आली आहे. तसेच विविध समित्यांचे कामकाज सुरू आहे या संमेलनासाठी येणाऱ्या संत महंतांची व्यवस्था या संमेलनासाठी येणारे संत, महंत, महिला तपस्विनी, साधू नामधारक वासनिक, भिक्षुक तसेच साहित्यिक व परराज्यातील महंत यांची व्यवस्था शहरातील चोपडा लॉन्स, राका गार्डन, श्रद्धा लॉन्स, पंचकृष्ण लॉन्स, पंचकृष्ण लॉन्स, लक्ष्मी विजय लॉन्स, शासकीय गेस्ट हाऊस, लक्ष्मी लॉन्स, सुदर्शन लॉन्स येथे करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास अनिल जाधव, साहेबराव आव्हाड, रवी पेखळे, शांताराम खांदवे, श्याम राजाराम कातोरे, प्रदीप वैद्य, किरण भडांगे, अमोल दिनकर पाटील, माजी सैनिक दिनकर रतन पवार, अनिल घुगे, वाल्मीक मोकळ, विकी भुजबळ, भगवान बारगजे, नितीन गायकवाड, बाळासाहेब जगताप, शरद पवार, कैलास शिंदे, विष्णू वैराळ, सचिन चौधरी सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्य कार्यकर्ते आणि जिल्हा निवासी संत, महंत, जिल्हा निवासी तपस्विनी, यासह सर्व शिक्षुक, पुजारी, वासनिक, साहित्यिक, सद् भक्त पंथातील सर्व मंडळे संस्था व पदाधिकारी, आदी सहकार्य करीत आहेत.