मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर बाबी मांडल्या आहेत. आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, तुम्हाला जिवंत जाळून टाकू, तुम्हाला लटकवून टाकू, अशा धमक्या दिल्या जात असल्याचा दावा रेडकर यांनी केला आहे.
क्रूझ ड्रग प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान आणि त्याचे मित्र सध्या कोठडीत आहेत. याच प्रकरणाचा वानखेडे तपास करीत आहेत. रेडकर म्हणाल्या की, सत्य शोधून काढणे आणि या सर्व प्रकरणाचा छडा लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, विविध खोटे आरोप करुन माझ्या पतीची बदनामी केली जात आहे. बनावट प्रमाणपत्र सादर करण्यापेक्षा नवाब मलिक यांनी थेट कोर्टात जावे. आम्हाला पोलिस संरक्षण मिळाले असले तरी आम्हाला धमक्या येत आहेत. समीर हे निर्दोष आहेत. वेळच मलिक यांना उत्तर देईल. समीर हे त्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्यापासून दूर होणार नाहीत. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. अँटी समीर असलेले एकत्र येऊन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे रेडकर यांनी स्पष्ट केले.
https://twitter.com/ANI/status/1452907239719591938







