गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

समीर भुजबळ यांची एन्ट्री होताच मका लिलावात तेजी….मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी खुश

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2024 | 1:47 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241116 WA0159 2

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांच्यामुळे नांदगाव बाजार समितीत कांद्याला दुप्पट भाव मिळाल्याची घटना ताजी असतानाच आता मनमाड बाजार समितीत समीर भुजबळ यांची एन्ट्री होताच मक्याच्या लिलावात तेजी पाहायला मिळाली.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.दरम्यान,असे शुभ संकेत देणारा उमेदवारच शेतकऱ्यांचे कल्याण करू शकतो.त्यामुळे आम्ही भुजबळ यांच्या पाठीशी आहोत, असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी बोलून दाखविला आहे.

समीर भुजबळ यांनी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीला आज सकाळी भेट दिली. त्यावेळी तेथे मका लिलाव सुरु होता. भुजबळ यांनी मका लिलावात स्वतः सहभाग नोंदवला. त्यांची ही एन्ट्रीच मका दरावर परिणाम करणारी ठरली. लिलावात तेजी आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. मका सुपर असेल तर २१०० ते २२०० रुपये तर बी ग्रेड मक्याला २००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याचे त्यांना दिसून आले. मक्का उत्पादक शेतकरी योगेश दराडे, त्र्यंबक पवार, कृष्णा वाघ, ज्ञानेश्वर बोराडे, सुनील वाबळे, रवींद्र घाडगे, कारभारी कातकडे, बाळासाहेब आव्हाड, प्रवीण शिंदे, जनार्दन शिंदे, बाळू डोंगरे यांचा मका लिलाव सुरू होता. समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमुळे मक्याचे दर प्रतिक्विंटल १०० रुपयांनी वाढल्याचे सांगत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, ठिकठिकाणी समीर भुजबळ यांचे हस्तांदोलन आणि हात जोडून स्वागत केले जात होते.

जाणून घेतल्या समस्या
यावेळी भुजबळ यांनी बाजार समितीतील विविध समस्या जाणून घेतल्या. व्यापारी, शेतकरी, कर्मचारी आदींनी त्यांना माहिती दिली. यावेळी बाजार समितीचे सभापती दीपक गोगड, संचालक योगेश कदम, आप्पा कुनगर, मधुकर उगले, सचिव बळीराम गायकवाड आदी उपस्थित होते. हमाल, मापारी यांनी त्यांच्या अडीअडचणी भुजबळ यांच्याकडे मांडल्या. वंजारवाडीचे शेतकरी मच्छिंद्र शिंदे म्हणाले की, स्वच्छ पाणी, शौचालय, शेतकरी निवास, चांगले रस्ते यांची बाजार समितीत नितांत गरज आहे.

अशी मंजुरी काय कामाची
सभापती दीपक गोगड म्हणाले की,नजर समितीतील सुविधांसाठी सव्वा दोन लाखांचा प्रस्ताव निवडणुकीच्या तोंडावर मंजूर करण्यात आला.त्यात २४ अटी-शर्थी टाकण्यात आल्या. कामासाठी अडचणीचा डोंगर उभा करून मिळालेली मंजुरी काय कामाची?असा सवाल गोगड यांनी उपस्थित केला.

शेतकरी भवन उभारणार
समीर भुजबळ म्हणाले की,शेतकऱ्यांसाठी भव्य शेतकरी भवन उभारले जाईल.नेहमीच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल.वचननाम्यात मी पुढील पाच वर्षांच्या विकासाचा आराखडा आपल्यासमोर सादर केला आहे.आता आपण सर्वांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील ९ क्रमांकाच्या शिट्टी या निशाणी समोरील बटण दाबून मला विजयी करावे,असे आवाहन भुजबळ यांनी यावेळी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानापुर्वी या तारखेला शाळांना सुट्टी नाही…शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

Next Post

अपघाताची मालिका सुरुच…वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू

Next Post
accident 11

अपघाताची मालिका सुरुच…वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011