नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज आज कायम ठेवला. गेल्या दोन तीन दिवसात त्यांनी माघार घ्यावी यासाठी केंद्रापासून तर राज्यातील प्रमुख नेत्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता. पण, त्यांनी हा दबाव झुगारुन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आज शिट्टी हे चिन्हही मिळालेल. भयमुक्त नांदगाव – प्रगत नांदगावसाठी ही उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या उमेदवारीबाबत याअगोदर समीर भुजबळ यांनी सांगितले होते की, गेल्या ५ वर्षांपासून मतदासंघांत दडपशाहीचे वातावरण आहे. विकासकामांना मोठी खीळ बसली आहे. जी विकासकामे झाली ती अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत त्यामुळे नांदगाव भयमुक्त आणि प्रगतशील करण्यासाठी उमेदवारी करत आहेत. ते कोणत्याही पक्षाचे नसून जनतेचे उमेदवार आहेत
समीर भुजबळ हे नाशिकचे खासदार असताना त्यांनी अनेक विकास कामे करून नाशिकचा कायापायलट केला होता. अनेक पथदर्शी प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील जनता त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. त्यामुळे ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून बहुमताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे, ठाकरे गटाचे गणेश धात्रक व अपक्ष उमेदवार डॅा. रोहन बोरसे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहे.