नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधानसभा मतदार संघातून समीर भुजबळ हे २८ ऑक्टोंबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा आहे. या मतदार संघात महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाने माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांना उमेदवारी दिली आहे. त्यात आता समीर भुजबळ हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.
दरम्यान आज मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. समीर भुजबळ महाविकास आघाडीकडून लढणार हे कधी बोलले. तुतारीकडे जाणार, कधी म्हणे मशालकडे जाणार ही चर्चा तु्म्हीच केली होती. तो आहे तिथेच आहे. आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तो उपस्थितीत राहणार आहे. तो अपक्ष लढणार हे मला सांगितले नाही. तु्म्हाला कसे सांगितले मला कल्पना नाही. आता तो स्वत:चा निर्णय घेण्यासाठी निर्णयक्षम आहेत असे सांगितले.
रिंगणात उतरले तर…
या मतदार संघात पंकज भुजबळ हे दोन वेळेस निवडून आले. पण, २०२९ च्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर या मतदार संघात भुजबळ कुटुंबिय सक्रियच होते. या मतदार संघाच्या सिमेला लागूनच येवला विधानसभा मतदार संघ आहे. या ठिकाणी छगन भुजबळ हे आमदार आहे. ते महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे समीर भुजबळ हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले तर त्याचा काय परिणाम महायुतीवर होतो हे बघणे महत्त्वाचे आहे.