शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अरबी समुद्रात शिवस्मारकाचा दुर्बिणीने शोध घेतला, पण कुठेच दृष्टीक्षेपात आले नाही…छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिक्रिया

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 6, 2024 | 6:14 pm
in मुख्य बातमी
0
Untitled 21


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजकारणासाठी शिवस्मारकाचे जलपूजन केले पण ८ वर्षांनंतरही स्मारक अरबी समुद्रात दूरपर्यंत दिसत नाही! अरबी समुद्रात शिवस्मारकाचा दुर्बिणीने शोध घेतला, पण कुठेच महाराजांचे स्मारक दृष्टीक्षेपात आले नाही अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. आज ते मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे गेले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह जहाजातून अरबी समुद्रात शिवस्मारक शोधण्याची मोहिम सुरु केली.

या मोहिमेबाबत ते म्हणाले की, मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही. त्यामुळे ही मोहिम सुरु केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निवडणुकीला फक्त शिवाजी महाराजांचं नाव वापरुन मत मागायचे हे मी होऊ देणार नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी डीसीपीमधून स्मारक आणि गडकोट किल्ल्यांसाठी किती पैसे खर्च केले असा सवालही त्यांनी केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना

Next Post

या ठिकाणी बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20241006 WA0330

या ठिकाणी बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011