छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ होत आहे. त्यातच एकट्या राहणाऱ्या तसेच विधवा महिला यांच्यावर तिच्या सासरचा मंडळींकडून अत्याचार केल्याच्या घटना घडण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात देखील अशीच एक अमानुष भयानक आणि धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या दिराने आपल्या चुलत वहिनीवरच अत्याचार केला आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या पतीचे तेरा दिवसापूर्वीच निधन झाले होते. तेराव्याच्या दिवशीच हा अत्याचाराचा प्रकार घडला असून याबाबत संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात नराधम दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्हा दाखल होताच आरोपी दीर फरार झाला आहे. मात्र पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असून, पैठण तालुक्यातील एका गावात दुपारी हा प्रकार घडला आहे, पीडित महिलेच्या पतीचे निधन झाल्याने तेराव्याचा कार्यक्रम असल्याने सकाळचा विधी पार पाडला. त्यानंतर सर्व आलेली पाहणी मंडळी निघून गेली घरात कोणीही नव्हते
दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पीडित महिला ही शेजारीच असलेल्या चुलत सासूच्या घरी गेली. यावेळी चुलत दीर हा एकटाच घरी होता. त्याने घरात कोणी नसल्याचे पाहून पीडितेवर अत्याचार केला आणि कोणाला काही सांगितले तर, जीवे मारण्याची धमकी दिली. पतीच्या निधनानंतर कोसळलेल्या या आघाताने महिला भेदरुन गेली होती.
त्यामुळे याबाबत कुणालाही काहीही सांगितले नाही. पण त्यानंतर पीडित महिलेने पाचोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यावरुन आरोपी दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला थोडी भोळसर आहे. अशा भयानक प्रकार घडल्याने परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Sambhajinagar Husband Death Rape on Women