छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक मंत्री संदीपान भुमरे आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील राड्याने चांगलीच चर्चेत आली आहे. हे दोघेही भर बैठकीत आपसांत भिडल्याने ही बैठक गाजली.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटातील आमदार एकमेकांवर जोरदार टीकाटीप्पणी करताहेत. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही शिंदे गटाचे भुमरे आणि ठाकरे गटाचे दानवे आमोरासामोर आले असता दोघांमध्येही शाब्दीक चकमक उडाली. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचं मुद्दा उपस्थित केला. यावरुन मंत्री संदीपान भुमरे यांनी आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्याने शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार राजपूत यांच्या मदतीला धावून आले आणि मंत्री भुमरे आणि सत्तार यांना सुनावले. यावरुन थेट हमरीतुमरी सुरु झाली आणि हा वाद थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आले.
कुणीही अंगावर धावून गेले नाही
ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. याची पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दखल घेत याबाबत जिल्हाधिकारी यांना सांगून आपल्याला लेखी कळवण्यात येईल असे म्हटले. मात्र, त्यानंतर देखील आमदार राजपूत यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, पालकमंत्री यांनी त्यांना कडक शब्दात सूचना केल्या. त्यानंतर बैठक सुरळीत झाली तर कोणेही कोणाच्या अंगावर धावून गेले नाहीत, असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
Sambhajinagar DPDC Meet Minister Bhumre Opposition Leader Danave
Controversy Aurangabad Planning Fund Distribution