कराड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या गाजलेल्या जाणता राजा महानाट्यप्रमाणेच डॉ. अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग सध्या महाराष्ट्रात गाजत आहेत. आता हे प्रयोग वेगवेगळ्या जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडत असतानाच कराड येथे एक मोठी दुर्घटना घडली असून डॉ. अमोल कोल्हे यांना प्रयोगादरम्यान दुखापत झाली आहे.
पाठीला दुखापत होऊन देखील त्यांनी जराही चेहऱ्यावर जराही तणाव जाणून देता प्रयोग हा महानाट्य प्रयोग पूर्ण केला, तसेच आजचा महाराष्ट्र दिनाचा विशेष प्रयोग देखील होणार आहे, मात्र त्यानंतर उपचारार्थ दोन प्रयोग रद्द करण्यात येणार आहेत.
शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. रविवारी रात्री कराडच्या मैदानावर प्रयोग सुरू असताना संभाजी महाराजांच्या वेषातील डॉ. कोल्हे घोड्यावरुन एन्ट्री घेताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला. त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली.
पाठीत कळ आल्याने त्यांना तात्काळ घोड्यावरून उतरवण्यत आले. मात्र त्या परिस्थितीतही डॉ. कोल्हे यांनी वेदनाशामक औषधे घेऊन चेहऱ्यावर दुखापतीचा भाव उमटू न देता जिद्दीने प्रयोग सादर केला. मात्र, डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिल्याने कोल्हे यांचे उर्वरीत प्रयोग रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली.
डॉ. कोल्हे यांच्या पाठीला दुखापत झाली तरी महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने १ मे रोजीचा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार असून उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. वास्तविक शिवपुत्र संभाजी या नाटकाने फार कमी वेळात लोकप्रियता मिळवली. त्यामुळे त्यांच्या जवळपास सगळ्याच प्रयोगांना चाहत्यांची गर्दी दिसत आहे. सध्या या नाटकाची खूप चर्चा होत आहे. मात्र १ मे रोजीचा प्रयोग संपल्यानंतर ते मुंबईत येऊन उपचार घेणार आहेत. ११ मे पासून पिंपरीतील एच.ए. मैदानावरील प्रयोग तितक्याच जोरदारपणे सादर केले जाणार आहेत.
Sambhaji Mahanatya MP Dr Amol Kolhe Injured