नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अडचणी दिवसागणिक वाढत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता नाशिकरोड पोलीस ठाण्यातही संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती येथे मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे गुरूजी यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजाराम मोहन राय, संत साईबाबा यांच्या विरुद्ध अपशब्द बोलून समाजात तेढ निर्माण करून जनमाणसांच्या भावना दुखवण्याचे काम केले. याची माहिती समाज माध्यमांकडुन मिळाल्यानंतर नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले मित्र मंडळ तसेच नाशिक रोड परिसरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व समाजसेवकांच्या वतीने गुन्हा दाखल करण्याकरिता निवेदन देण्यात आले होते. यावेळी गुन्हा दाखल केला नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांनी वरिष्ठांची चर्चा करुन गुन्हा नोंदवण्याची ग्वाही दिली. त्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यता आला आहे.
सदर निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप, कामगार नेते जयंत गाडेकर, व्यापारी बँकेचे संचालक सुधाकर जाधव, बिझनेस बँकेचे संचालक पुरुषोत्तम फुलसुंदर, माजी नगरसेवक अस्लम भैया मणियार, केशव पोरजे, शंकर भाई मंडलिक, संजयजी अढांगळे, योगेश गाडेकर योगेश भोर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले कलाक्रीडा मित्र मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष गाडेकर, संतोष पुंड, रवी पेरेकर, सुनील गाडेकर ,आदर्श गाडेकर, सुनील गाडेकर, विकास गिते, कोंडाजी ताजणे, प्रदीप गाडेकर, विशाल गाडेकर, समाधान जेजुरकर, निलेश पुंड योगेश खैरे, सागर महाजन, आदर्श जाधव, सलिम शेख, सुखदेव लोंढे, आकाश फोकणे, रवी गाडेकर, किशोर आहिरे, जनार्दन ढोकणे, लंकेश गाडेकर नंदलाल धिवर, विजय गाडेकर, आधी सर्व उपस्थित होते.
sambhaji bhide nashik police station fir
shivpratishthan manohar bhide guruji