नाशिक – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पूजा आहेर एंडाईत तर महिला शहराध्यक्षपदी आशा भंदुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर,नाशिक शहराध्यक्ष कविता कर्डक, जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.