उत्तरा तिडके आणि सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शहरालगत असलेल्या टाकळी गावात श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या गोमय मारुती मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्यामुळे या मंदिराचा पूर्णपणे कायापालट झाला. या मंदिराला पौराणिक इतिहास आहे. गोदावरी आणि नंदिनी या दोन्ही नद्यांच्या संगमावर हे मंदिर आहे. या मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर इथे अनेक संतांचे फोटो आणि समर्थांच्या हस्तलिखित पाने बघायला मिळतात. समर्थ कालीन विहीरही या ठिकाणी आहे. या मंदिराचा जिर्णोध्दार झाल्यामुळे हे मंदिर आता भव्य वाटते. तर बघूया हे मंदिर आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी या व्हिडिओतून….