इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले मुलायमसिंह यादव (वय ८२) यांचे निधन झाले. युरिनरी इन्फेक्शन, रक्तदाबाची समस्या आणि श्वासोच्छवासाचा त्रास यामुळे यादव यांमा २ ऑक्टोबरला मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. मेदांता यांच्या आयसीयू आणि क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) मध्ये नऊ दिवस जीवन आणि मृत्यू यांच्यातील झुंज दिल्यानंतर आज सकाळी ८.१६ वाजता यादव यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुलायमसिंह यादव यांच्या निधनामुळे त्यांचे समर्थक आणि पक्षाच्या ओलांडून विविध राजकीय विचारधारा घेऊन काम करणाऱ्या राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये देशभरात शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुलायम सिंह यांच्या प्रकृतीबाबत देशभरात चिंता व्यक्त केली जात होती.
मुलायम सिंह यादव यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या वतीने समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यादव यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. ट्विटमध्ये लिहिले आहे- ‘माझे आदरणीय वडील राहिले नाहीत – अखिलेश यादव.’ मुलायमसिंह यादव यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचे समर्थक, जवळचे कुटुंबीय आणि राजकीय नेते-कार्यकर्त्यांची मेदांता हॉस्पिटलमध्ये गर्दी होऊ लागली. मोठ्या संख्येने येणारे नागरिक पाहता रुग्णालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
https://twitter.com/samajwadiparty/status/1579323802483556352?s=20&t=SOb97x_DuvH6lsIymgyV3Q
Samajwadi Party Founder Mulayam Singh Yadav Death