पुणे – भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती , विमुक्त जाती ,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी दिनांक ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालय बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला जात आहे, त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहु नये म्हणुन अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.
पुणे विभागातील महाविद्यालयामंध्ये सन २०२०-२१ मध्ये प्रवेश घेतेलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तात्काळ https:// mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाइन सादर करावेत. विभागातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन प्रणालीतून संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत असे आवाहन बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण पुणे विभाग, पुणे यांनी केले आहे.