नाशिक – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी समाधान जेजुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांचे पत्र समाधान जेजुरकर यांना प्राप्त झाले. हे नियुक्तीचे पत्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या हस्ते समाधान जेजुरकर यांनी स्वीकारले.
सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ओबीसी सेलच्या माध्यमातून पक्ष विस्तारासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू व ओबीसींच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेऊ असे समाधान जेजुरकर यांनी आपल्या निवडी नंतर बोलतांना सांगितले.
यावेळी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ , माजी खासदार समीर भुजबळ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्यासह पक्षातील सर्व नेत्यांचे आभार मानले.यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, हर्षल खैरनार आदी उपस्थित होते.