विशेष प्रतिनिधी, मुंबई
सलमान खानचा चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. आणि एका दिवसात तब्बल ४२ लाख लोकांनी हा चित्रपट ऑनलाईन पाहिला. या चित्रपटाला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल सलमान खानने चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
सलमान खानने टि्वटरवर सर्वांसाठी एक संदेशही दिला आहे. चाहत्यांशिवाय चित्रपट क्षेत्राला काही अर्थच नाही असे सांगताना एका दिवसांत सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट म्हणून राधेला निवडल्याबद्दल चाहत्यांना धन्यवाद दिले आहेत. ईदनिमित्त तुम्ही मला एक छान रिटर्न गिफ्ट दिल्याचेही तो म्हणाला.
या पोस्टसोबत त्याने दिशा पाटनीसोबतचा फोटो शेअर केला आहे. कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती जेव्हा सुधारेल तेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा आमचा विचार असल्याचे सलमानने नुकतेच एका मुलाखतीत म्हटले होते.









