इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईत अभिनेता सलमान खानने बुधवारी आपल्या कुटुंबासह गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला. त्याचा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान यांचे सर्व कुटुंबिय आरती करतांना दिसते. पहिले सलमानची आई सलमा खान प्रथम करते त्यानंतर वडील व ज्येष्ठ गीतकार सलीम खान आरती करतात. तर शेवटी सलमान खान स्वतःही भावपूर्ण आरती करताना दिसतो. या व्हिडिओमध्ये अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नीही आरती करतांना दिसते. बघा, हा आरतीची संपूर्ण व्हिडिओ….