मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन सन्मानित केले. तसेच याप्रसंगी त्यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.
यावेळी माझा पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ.वृषाली आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
एसटी कर्मचा-यांनीही घेतले दर्शन
राज्य परिवहन महामंडळाच्या चालक वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी आज वर्षा निवासस्थानी येऊन विराजमान झालेल्या श्री गणेशाची मनोभावे आरती केली. यावेळी या सर्वांसोबत संवाद साधत या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर हेदेखील उपस्थित होते.