अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सह्याद्रीच्या डोंगर रांगा मधील महत्वपूर्ण असलेला साल्हेर किल्ला सध्या हिरवाईने नटलेला असल्याने या परिसराचे सौदर्य अधिकच खुलून गेले आहे. संपूर्ण बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टाच हिरवागार झाला आहे. सध्या अधून मधून कधी जोरदार तर कधी रिमझिम पाऊस पडत असल्याने या परिसरातील झऱ्यांचा मंजुळ आवाज कानाला मोहित करतोय तर धुक्याची चादर पसरलेल्या असल्याने निसर्ग भुरळ घालत असल्याने विकेंडला पर्यटकाना या परिसरात जाण्याचा मोह मात्र झाल्या शिवाय राहवत नाही. साल्हेर किल्ला परिसरातील गणेश घाटातून घेतलेले हे दृश्य, याच बरोबर डोंगर उतारावर गर्द हिरवाईत आदिवशींची टुमदार घरे तर अगदी खुलून दिसतात. बागलाण तालुक्यात अशी शांत आणि एकदिवशीय एन्जॉय करण्यासाठी अनेक ठिकाण नजरेस पडतात. अशा ठिकाणी आल्यावर आठवडा भराचा थकवा शांत निसर्गरम्य वातावरणात दूर झाल्याशिवाय राहत नाही हे मात्र तितकेच खरे