देशाच्या राष्ट्रपतींनी किती वेतन मिळते आणि त्यांना किती कर भरावा लागतो, याबाबत सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा सुरू आहे. अर्थात या चर्चेची सुरुवात स्वतः भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीच केली. उत्तर प्रदेशात अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी आपल्या पगाराचा आणि त्यांना भरावा लागणाऱ्या कराचा उल्लेख केल्यामुळे नेटकऱ्यांना चर्चेसाठी एक निमित्तच मिळाले आहे.
उत्तर प्रदेशात एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपतींनी आपव्याला ५ लाख रुपये वेतन असून त्यातील २ लाख ७५ हजार रुपयांचा प्राप्तीकरात जातो, अशी माहिती दिली होती. कर भरल्यावर हाती येणारी रक्कम राष्ट्रपतींच्या कार्यालयात कार्यरत अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनापेक्षा कमी आहे, हे विशेष. एवढेच नाही, तर राष्ट्रपती ज्या कार्यक्रमात हे बोलत होते, त्याठिकाणी शिक्षक उपस्थित होते. त्या शिक्षकांपेक्षाही राष्ट्रपतींना मिळणारे वेतन कमी आहे, हेही रामनाथ कोविंद यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले.
राष्ट्रपतींना खरे तर १ लाख ५० हजार रुपये वेतन भारतात मिळायचे. मात्र २०१७ मध्ये नरेंद्र मोदी सरकारने हे वेतन वाढवून ५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला. प्राप्तिकर अधिनियम आणि राष्ट्रपती पेन्शन अधिनियम या वेतनावर कर सवलत देत नाहीत. त्यामुळे राष्ट्रपतींना ५ लाख रुपयांवर २ लाख ७५ हजार रुपये कर भरावा लागतो. पण राष्ट्रपतींना मिळणाऱ्या सुविधाही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यांना निवास भत्ता, आरोग्य सुविधा, मोफत प्रवास आदी सुविधा मिळतात. निवृत्तीनंतर दिड लाख रुपये निवृत्तीवेतनही मिळत असते. त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांवर खर्च करण्यासाठी ६० हजार रुपये अतिरिक्तही मिळतात, हे महत्त्वाचे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!