मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील गुरुव्दारा मध्ये सालाबादाप्रमाणे यंदाही श्री गुरुगोविंदसिंगजी महाराज यांच्या ३५६ व्या प्रकाशपूरब निमित्ताने सालाना जोडमेला आयोजन करण्यात आले त्यानिमित्ताने तीन दिवस चाललेल्या धार्मिक कार्यक्रमाची आज सांगता होऊन शहरातून दुपारी पंचप्यारे निशान साहेब यांच्यासह गुरुग्रंथ साहेबाची भव्य नगर किर्तन शोभा यात्रा काढण्यात आली,संपुर्ण शहराला नगर प्रदिक्षणा घालत निघालेल्या या शोभायात्रेत शीख बांधवांनी अनेक मर्दानी खेळ खेळले, या कार्यक्रमासाठी राज्यभरातून शीख बांधवांनी गर्दी केली होती.