नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तराखंड येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मल्लखांब स्पर्धा ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. त्यासाठी डेरवण. चिपळूण येथील स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र संघाचे मुलांचे आणि मुलीचे शिबीर संपन्न झाले. या संघाचे प्रशिक्षक म्हणून नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेची खेळाडू साक्षी गर्गे हीची नियुक्ती करण्यात आली आहे. साक्षी ही स्वतः मल्लखांबाची राष्ट्रीय खेळाडू असून तीने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनेक पदके प्राप्त केलेली आहे. सध्या ती प्रशिक्षक म्हणून यशवंत व्यायाम शाळा येथे कार्यरत आहे.
तिला यशवंत व्यायाम शाळा आणि नाशिक डिस्ट्रिक्ट मल्लखांब असोसिएशन यांचा कायम सपोर्ट आणि आशीर्वाद असल्यामुळे हे शक्य झाले आहे. यशवंत व्यायाम शाळेचे आणि नाशिक डिस्ट्रिक्ट मल्लखांब असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभत असते, त्यामुळेच अश्या विविध संधी मिळतात, अशी प्रतिक्रिया साक्षीने व्यक्त केली.
यानिमित्ताने तीने सर्व पदाधिकारी व प्रशिक्षक यांचे आभार मानते. डेरवण येथे आयोजित सराव शिबीरामध्ये खेळाडूंचा चांगला सराव झाला आहे. त्यामुळे खेळाडू निश्चितच उत्तराखंड येथील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला हे दोघेही संघ महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देतील याची मला खात्री आहे असा विश्वास साक्षी गर्गे हीने व्यक्त केला. तिला यशवंत व्यायाम शाळेचे तथा नाशिक डिस्ट्रिक्ट मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील, प्रशिक्षक यशवंत जाधव, आनंद खरे आणि सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.