साक्री – साक्री तालुक्यातील भाडणे कोविड सेंटर येथे स्वच्छतेअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. जे कर्मचारी आहेत त्यांना रात्रंदिवस काम करावे लागत आहे. अत्यंत निर्कुष्ट दर्जाचे बेड त्यावर बेडसीट पण नाही,कचर-याची योग्य विल्हेवाट लावलेली नाही, रुग्णांना पाणी पिण्याचे व्यवस्था नाही अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माणचे जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धीरज देसले यांनी केली आहे. त्यांनी या सेंटरचे काही फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
रुग्णांचे हाल होत आहेत
मी भाडणे कोव्हीड सेंटर सेंटर येथे अचानक भेट दिली. त्या ठिकाणी रुग्णांचे हाल होत आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे. या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही,पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही. प्रशासानाने लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध करुन द्यावी, रुग्णांचे हाल होणार नाहीत याची काळजी घ्यावी
धीरज देसले,प्रदेश उपाध्यक्ष जनहीत कक्ष ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना









