पिंपळनेर – धुळे जिल्ह्यासह साक्री पंचायत समिती पोटनिवडणूक उदया ५ ऑक्टोबरला असून या निवडणुकीसाठी पिंपळनेर गणातून तिरंगी लढत दिसत आहे, या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार या निकालाकडे पिंपळनेर सह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रामुख्याने ही तिरंगी लढत पिंपळनेर गणासाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे, या लढतीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देवेंद्र गांगुर्डे, महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रकाश विसपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संभाजी अहिराव हे तिन उमेदवार पिंपळनेर गणातून निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी पिंपळनेर परिसरातील राजकीय क्षेत्रातील नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतांना दिसत आहे. ही तिरंगी लढत अत्यंत अटीतटीची मानली जात आहे, या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार हे बघण्यासाठी जनता उत्सुक आहे. या निवडणुकीचा निकाल ठरवणार पुढील राजकीय समीकरणे
या निवडणुकीचा कसा लागतो यावर भविष्यातील राजकीय समीकरण अवलंबून असणार आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.