मुंबई – राज्यात सध्या गाजत असलेल्या साकीनाका बलात्कारावरुन सध्या सर्वत्र विविध मते-मतांतरे व्यक्त केली जात आहे. तसेच, महिला अत्याचाराबाबत सर्वत्र चर्चा झडत आहे. अशातच अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ हिने याप्रकरणावर फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आहे. ही पोस्ट अतिशय आक्रमक स्वरुपाची आहे. त्यामुळे तिची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. अनेकांनी या पोस्टचे स्वागत केले आहे. हेमांगी ही अतिशय बेधडकपणे आपले व्यक्त विचार करते. आताही तिने याप्रकरणावर परखड भाष्य केले आहे. तिने फेसबुकला पोस्ट केलेले विचार असे
आणखी एक!
तिचीच चूक असणार!
तिचे कपडे चुकले असतील!
एवढ्या रात्री ती काय करत होती?
एकटी होती की कुणासोबत होती? तिची जात काय, धर्म काय, कुठे काम करत होती? किती कमवत होती? लग्न झालेली होती, single होती, divorcee होती, मुलं बाळं किती? ती मुंबईची की आणखी कुठली! सगळं सगळं तीचंच चुकलं असणार!
चला आता आपण तिलाच आणखीन घाबरऊन ठेऊया!
बाकी त्याला कसलंच बंधन नको, सगळी सूट देऊया! काय?