इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारताची स्टार बॅटमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप यांनी घटस्फोट घेतला आहे. याची माहिती सायनाने सोशल मीडियावर देत चाहत्यांना धक्का दिला आहे. २०१८ मध्ये दोघांनी लग्न केले होते. त्यानंतर ७ वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
या घटस्फोटानंतर सायनाने सांगितले की, आयुष्य कधीकधी आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर पारुमल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय़ घेतला आहे. आम्ही दोघंही स्वत.साठी आणि एकमेकांसाठी शांतता, प्रगती आणि विरामाचा मार्ग निवडत आहोत. या आठवणींसाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असे म्हटले आहे.