शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा संस्थानचे तदर्थ समिती सदस्य सिध्दाराम सालीमठ यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी विणा घेऊन तर कृषी अधिकारी अनिल भणगे व मुख्याध्यापक कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गंगाधर वरघुडे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला.
यावेळी संस्थानचे प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणास सुरवात झाली. यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन करताना संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ उपस्थिती होते.