नाशिक – शुकवार, शनिवार, रविवार दिनांक ३, ४, ५ डिसेंबर २०२१ या तीन दिवसात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॅालेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिक येथे आयोजित केले आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॅा. जयंत नारळीकर यांची निवड झाली असून स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे असणार आहे. संमेलनपूर्व गुरुवार २ डिसेंबर सायं. ७ वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संमेलनस्थळी केले आहे. शनिवार ४ डिसेंबर रोजी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम सायंकाळी होणार आहे. तसेच संमेलन समारोपाच्या दिवशी एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे.
पहिला दिवस : शुक्रवार दि. 3 डिसेंबर 2021
शुक्रवार दि. 03 डिसेंबर 2021 सकाळी 8.30 वा. ग्रंथदिंडी कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिकळवाडी, नाशिक येथून निमाणी बस स्टँड पर्यंत पायी जावून तेथून वाहनांनी कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नाॅलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिकच्या प्रवेशद्वारापर्यंत जाईल. तेथून परत दिंडी पायी संमेलन स्थळापर्यंत जाईल. संमेलनस्थळी सकाळी 11.00 वा. ध्वजाराेहणाचा कार्यक्रम महामंडळाचे तसेच संमेलन पदाधिकारी, स्वागत समिती सदस्य तसेच निमंत्रित. साहित्यिक, रसिक आदींच्या उपस्थिती हाेणार आहे. दुपारी 4.00 वा. गं्रथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन हाेईल. प्रथा व परंपरेनुसार स्वागताध्यक्षांचे भाषण, 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षांचा आणि उपस्थित संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा सत्कार, 93 व्या संमेलनाच्या अध्यक्षांचे मनाेगत आणि नविन अध्यक्षांकडे अध्यक्षीय सूत्र प्रदान कार्यक्रम, उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डाॅ. जयंत नारळीकर यांचे भाषण हाेईल. सुरुवातीला स्वागत गीत, संमेलन गीत आणि अखेरीस आभार प्रदर्शन असेल.
रात्री 9 वा. निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन हाेईल. कवि श्रीधर नांदेडकर हे या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून सूत्रसंचलन संजय चाैधरी हे करणार आहेत. या काव्य संमेलनासाठी सर्वश्री कवि दगडू लाेमटे, सय्यद अल्लाउद्दीन, रवि काेरडे, प्रिया धारुरकर, मनाेज बाेरगावकर, वैजनाथ अनमूलवाड, साै. भाग्यश्री केसकर, नंदकुमार बालुरे, वाल्मिकी वाघमारे, इरान शेख, किशाेर बळी, दिनकर वानखेडे, अनिल जाधव, विजय शंकर ढाले, तीर्थराज कापगते, मनाेज सुरेंद पाठक, विष्णु साेळंके, गजानन मानकर, मिनाक्षी पाटील, संजय कृष्णाजी पाटील, रामदास खरे, प्रविण बाेकुलकर, गीतेश शिंदे, मनाेज वराडे, वैभव साटम, गाैरी कुलकर्णी, संगिता धायगुडे, विलास गावडे, अमाेल शिंदे, अजय कांडर, विनायक कुलकर्णी, अविनाश चव्हाण, संजीवकुमार साेनवणे, विजय जाेशी, अंजली बर्वे, प्रशांत केंदळे, दयासागर बन्ने, साहेबराव ठाणगे, प्रकाश हाेळकर, उत्तम काेळगावकर, संदिप जगताप, मिलींद गांधी, रेखा भांडारे, विष्णु भगवान थाेरे, कमलाकर देसले, राजेंद्र केवळबाई दिघे, सुषमा ठाकूर, किरण काशिनाथ, दिपा मिरिंगकर, नीता शहा, प्रा. लक्ष्मण महाडिक, काशिनाथ वेलदाेडे, डाॅ. माधवी गाेरे मुठाळ, सुशिला संकलेचा आदी कवींना निमंत्रित केलेले असून या कविसंमेलनासाठी महाराष्ट्रातील कवि तर आहेतच शिवाय भाेपाळ, गाेवा आणि गुजरात या राज्यातील कवीही निमंत्रित आहेत.
दुसरा दिवस : शनिवार दि. 4 डिसेंबर 2021
सकाळी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डाॅ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ समीक्षक डाॅ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनाचे श्री. दिलीप माजगावकर हे घेणार आहेत. महामंडळाच्या वतीने एका ज्येष्ठ लेखक व प्रकाशक यांचा सत्कार करण्यात येताे. यावर्षी नाशिकचे ज्येष्ठ लेखक, नाटककार, कांदबरीकार श्री. मनाेहर शहाणे आणि ग्रंथालीचे श्री. सुदेश हिंगलासपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष डाॅ. जयंत नारळीकर यांचा हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनात ‘संवाद लक्षवेधी कवींशी’ हा विशेष कार्यक्रम हाेणार आहे. लक्षवेधी कवी म्हणून सर्वश्री प्रुल्ल शिलेदार, किशाेर कदम (साैमित्र), सुचिता खल्लाळ, खालील माेमीन आणि वैभव जाेशी या कवींसमवेत श्री. विश्वाधार देशमुख आणि गाेविंद काजरेकर हे त्यांचा काव्यप्रवास उलगडून दाखविणार आहेत.
परिचर्चा कार्यक्रम :
दुपारच्या सत्रात ‘स्मृतीचित्रे : लक्ष्मीबाई टिळक’ या विषयावर परिचर्चा आयाेजित केली आहे. या चर्चेचे सूत्रधार डाॅ, एकनाथ पगार आहेत. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जाेशी, रेखा इनामदार साने, डाॅ. गजानन जाधव आणि डाॅ. माेना चिमाेटे हे सहभागी हाेणार आहेत.
कथाकथन :
दुपारच्या सत्रात कथाकथनाचा कार्यक्रम श्री. विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली हाेईल. आघाडीचे कथाकार गिरीश देसाई, विद्याधर बनसाेड, बाबासाहेब परीट, राजेंद्र गहाळ हे आपल्या कथा सादर करतील. कथाकथनाचे प्रात्यक्षिक म्हणून हा साहित्य संमेलनात महत्वपूर्ण कार्यक्रम ठरणार आहे.
परिसंवाद :
सायंकाळी काेराेनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार या विषयावर श्री. जयदेव डाेळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद हाेणार असून त्यामध्ये सर्वश्री मकरंद कुलकर्णी, डाॅ. आशुताेष रारावीकर, विनायक गाेविलकर, डाॅ. हंसराज जाधव, दीपक करंजीकर, डाॅ. राहुल रनाळकर हे वक्ते म्हणून असतील. सायंकाळी गाेदातिरीच्या संतांचे याेगदान – श्री. रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली हाेणाèया या परिसंवादामध्ये श्रीमती धनश्री लेले, प्रा. विवेक अलाेणी, चारुदत्त आफ़ळे, डाॅ. दत्तात्रय घुमरे, गीता काटे, बिशप थाॅमस डाबरे, डाॅ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांस वक्ते म्हणून निमंत्रित केले आहे.
कविकट्टा :
संमेलनस्थळी कविकट्ट्याचे आयाेजन केले असून हा कविकट्टा सलग 2 रात्री सुरु राहणार आहे. संयाेजन राजन लाखे, संदिप देशपांडे आणि संताेष वाटपाडे हे करणार आहेत. महाराष्ट्रातील 700 कवी आपापल्या रचना सादर करणार आहेत.
बाल साहित्य मेळावा :
साहित्य संमेलनाला जाेडून यावर्षी प्रथमच बाल साहित्य मेळावा हाेत आहे. दि. 4 डिसेंबर 2021 राेजी सकाळी या मेळाव्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध रंगकर्मी व लेखक श्री. दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली हाेणार आहे. यामध्ये सर्वश्री सुर्यकांत मालुसरे, प्रा. पृथ्वीराज ताैर, संजय पेंडसे, आश्लेषा महाजन, विनाेद सिंदकर, किरण भावसार, विद्या सुर्वे बाेरसे, संदिप देशपांडे, संजय वाघ, प्रशांत गाैतम व संताेष हुदलीकर यांचा सहभाग असेल.
कला प्रदर्शन :
संमेलनस्थळी नाशिकचे शिल्पकार, चित्रकार आदी कलाकारांचे वैशिष्ट्यपूर्ण असे कलाप्रदर्शनही तेथे आयाेजित केले आहे.
नाशिक लेखक पुस्तक प्रदर्शन :
कुसुमाग्रजनगरीमध्ये सर्व रसिक नागरिकांच्या माहितीसाठी नाशिकच्या लेखकांचे पुस्तक प्रदर्शनही भरवले जाणार आहे.
तिसरा दिवस : दि. 5 डिसेंबर 2021
परिसंवाद :
सकाळी ‘मराठी नाटक – एक पाऊल पुढे, दाेन पावले मागे’ श्री. शफ़ाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली हाेणाèया या परिसंवादामध्ये वक्ते श्रीमती लता नार्वेकर, सर्वश्री. पराग घाेंगे, डाॅ. सतीश साळुंके, सुबाेध भावे आणि प्राजक्त देशमुख यांस निमंत्रित केले आहे.
सकाळी ‘शेतकèयांची दु:स्थिती, आंदाेलने, राजसत्ताचा निर्दयपणा, लेखक कलावंताचे माैन आणि सेलिब्रिटींची भूमिका ’ श्री. भास्कर चंदनशीव यांच्या अध्यक्षतेखाली हाेणाèया या परिसंवादामध्ये आ. बच्चू कडू, श्री. रमेश जाधव, श्री. मिलींद मुरुगकर व श्री. संजय आवटे यांचा सहभाग अपेक्षित आहे.
दुपारी ‘ऑनलाईन वाचन – वाङमय विकासाला तारक की मारक’ – डाॅ. दिलीप धाेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली हाेणाèया या परिसंवादामध्ये वक्ते म्हणून श्रृतीश्री वडगबाळकर, धनंजय गांगळ, श्रीमंत माने, डाॅ. विलास साळुंके, मयुर देवकर यांचा सहभाग अपेक्षित आहे.
दुपारी साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थाेतांड – डाॅ. निलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली हाेणाèया या परिसंवादामध्ये वृषाली देशपांडे, डाॅ. भगवान कारे, डाॅ. वृंदा भार्गवे, इब्राहिम अफ़गाण, प्रा. भास्कर ढाेके यांचा सहभाग असेल.
नाशिक जिल्हा विशेष परिसंवाद :
नाशिक जिल्हा स्थापनेला 150 वर्ष झाली आहेत. या निमित्ताने नाशिक जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्प या विषयावरील खास परिसंवाद जिल्हाधिकारी श्री. सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हाेणार आहे.
संमेलनाचा समाराेप रविवार दिनांक 5 डिसेंबर 2021 राेजी सायंकाळी 6 वाजता हाेईल. समाराेपानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयाेजन केले आहे.