नाशिक – नाशिकमध्ये प्रस्तावित असलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९, २० व २१ नोव्हेंबरला होणार आहे. कोरोना संसर्गामुळे हे संमेलन लांबणीवर टाकण्यात आले होते. पण, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता आणल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आज नाशिकमध्ये कोरोना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संमनेलनाबाबत मोठे विधान केले होते. त्यांनी पुढील महिन्यात दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात नाशिकमध्ये साहित्य संमेलन घेण्याबाबत चाचपणी केली जाईल. अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही असे सांगितले होते. पण, सायंकाळी आता संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्या आहे.