नाशिक – ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजन मंत्री छगन भुजबळ यांनी अतिशय सुंदर केली आहे. हे संमेलन नव्या तंत्रज्ञानाने हे साहित्य संमेलन जगभरात जाऊन पोहचले आहे. नाशिक मध्ये झलेलं हे संमेलन देशातील अतिशय सर्वोत्कृष्ट साहित्य संमेलन म्हणून नाशिकच्या साहित्य संमेलनाची नोंद होईल असा विश्वास मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, नाशिकच्या मातीला साहित्याचा इतिहास आहे. ज्या संत ज्ञानेश्वराणी पाया रचला त्यांचे गुरू निवृत्तीनाथ यांनी त्र्यंबकेश्वर येथे साहित्य लिहिले. त्यातून समतेचा संदेश त्यांनी यातून दिला. मराठी साहित्याची सुरुवात या ब्रम्हगिरीच्या पायथ्यापासून सुरू झाली हे विसरता येणार नाही. येथील पाण्यात आणि मातीत मुळातच साहित्य असून या भूमीतून अनेक साहित्य पुढे येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिथे चुकीच घडतंय त्या ठिकाणी साहित्यिकांनी बोललं पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीवर बोललं जातं तेव्हा साहित्यिकांनी गप्प बसता कामा नये. आज स्वातंत्र्यावर बोलल जातंय उद्या घटनेवर बोललं जाईल. अशा वेळी गप्प बसता येणार नाही अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला अस्वस्थता जाणवल्याशिवाय राहणार नाही. ज्या ज्या वेळी राज्यघटना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळी लोकशाही व्यवस्था वाचविण्यासाठी साहित्यिकांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.