औरंगाबाद – ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागतमंडळच्या पदाधिका-यांनी औरंगाबाद येथे साहित्य महामंडळाच्या कार्यालयात पदाधिका-यांची भेट घेऊन साहित्य संमेलन घेण्याबाबत चर्चा केली. यावेळी सांहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॅा. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॅा. रामचंद्र काळुंखे हे उपस्थिती होते. या भेटीत संमेलनाच्या संबधीत प्रश्नावर चर्चा करण्यात आली. त्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर साहित्य संमेलन घेऊ असे निश्चित झाले. त्याच्या तारखा मात्र सांगण्यात आल्या नाही. या बैठकीत ऑनलाईन संमेलन घेणे स्वागतमंडळाच्या विचारधीन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीत प्रमुख कार्यवाह व लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आणि स्वागतमंडळाचे समितीप्रमुख विश्वास ठाकुर, कार्यवाह शंकर बोराडे, दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, विनायक रानडे हे उपस्थिती होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांशी यावेळी चर्चा झाली.
या चर्चेत नाशिककरांना हे साहित्य संमेलन घ्यावयाचे आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर साहित्य संमेलन घेऊ. आजच संमेलनाच्या तारखा सांगणे अशक्य आहे. मात्र संमेलन फार पुढे जाणार नाही याची दक्षता स्वागतमंडळ आणि लोकहितवादी मंडळ घेईल. त्या संदर्भात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करुन साहित्य संमेलन लवकर घेता येईल याचा आम्ही प्रयत्न करु असे नाशिकच्या पदाधिका-यांनी सांगितले. त्यानंतर साहित्य महामंडळाचे या चर्चेचे पत्रही प्रसिध्दीत दिले आहे.