नाशिक – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर येऊ शकले नाही याची उणीव भासत आहे. साहित्य महामंडळाने संहिता बदलली त्यातून नवीन अध्यक्ष निवडण्यात आले. या संमेलनात अध्यक्ष हजर राहू शकले यांनी यामुळे संमेलनास वेगळी किनार लाभली. त्यामुळे यापुढे अध्यक्ष निवडीबाबत विचार करावा लागणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, तरुण साहित्यिकांना बोलत करणं हा साहित्य संमेलनाचा प्रयत्न आहे.समाज स्थितीशील राहिला नाही गतिशील झाला आहे. हळुवार का होईना बदल होत आहे हा बदल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.साहित्य संमेलनाच्या साहित्यिक मेजवाणीचा लाभ नागरिकांना घ्यावा विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच नाशिकचं संमेलन इतकं वेठीस धरलं गेलं त्याचा मला खेद वाटतो. आपल्याला असलेल्या प्रश्नांची उत्तरे चर्चेतून मिळू शकतात. त्यामुळे वादविवाद टाळावे असे त्यांनी यावेळी सांगितले.