नाशिक – नाशिकचे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश भिमराज सावंत यांच्या ॲक्रीलिक माध्यमातील निसर्गचित्र ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचेच्या मुखपृष्ठावर अधिष्ठित होणार आहे, गोदावरीची फक्त एक नदी असल्याची ओळख नसून अनादिकालापासून नाशिकचे महात्म्य वाढवणारी सुवर्णमानबिंदू आहे, नाशिकच्या सांस्कृतिक, आध्यत्मिक, पौराणिक ऐतिहासिक वैभवा चे प्रतीक म्हणून विश्वविख्यात आहे, या गोदातीरी दर बारा वर्षांनी होणाऱ्या जगप्रसिद्ध कुंभमेळ्या सोबतच होणारे असंख्य सामाजिक, आध्यत्मिक, धार्मिक कार्यक्रमे, तसेच सुप्रसिद्ध अशा वसंत व्याख्यानमालेसह अनेक ऐतिहासिक घटनाची साक्षीदार गोदावरी आहे.
याच विलोभनीय सौंदर्य असलेल्या गोदेच्या पैलतीरी अनेक वाचक साहित्याचा मनमुराद आनंद गोदावरीच्या मनमोहक प्रतीबिंबा जवळ पुस्तके, ग्रंथ वाचनातून घेत असताना ही नेहमी दिसत असतात, याच प्रसंगावर आधारित नाशिकचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश भिमराज सावंत यांनी ऍक्रेलिक माध्यमात १६ x २० इंच आकाराच्या कॅनव्हासवर याच सारस्वतच्या वाचनसंस्कृती दर्शविणारे निसर्गचितत्रात वास्तववादी पध्दतीने आपल्या खुमासदार जगप्रसिद्ध अशा चित्रशैलीत, प्रत्यक्ष गोदावरी नदी काठी अनेक कला रसिकांच्या उपस्थितीत लाईव्ह चित्रित केले आहे,
संत गाडगे महाराज पुलाजवळील या दृश्यात चित्रकार राजेश सावंत यांनी आपल्या रंग कुंचल्यातून गोदावरीचे उत्कट सौंदर्य अत्यंत कलात्मक पद्धतीने चित्रित केलेले आहे, यात त्यांनी उष्ण-शीत रंगसंगतीचा अत्यंत मार्मिक वापर केलेला आहे. गोदावरी नदीच्या मनाला मोहून टाकणारे प्रतिबिंब हे या चित्राचा आत्मा आहे. निसर्ग चित्रातील मानवी हालचाली व त्यांचे अस्तित्व चित्राची एक वेगळी कलात्मक उंची वाढवतात तसेच या चित्रातील असलेल्या अल्हाददायक वातावरण हे ही लक्षवेधी आहे. भव्य आकाशाचा वेध घेणार पाखरे, ऊन सावल्यांचा लपंडाव यासारख्या अनेक वैशिष्ट्यांनी नटलेले हे चित्रकार राजेश सावंतांचे हे निसर्गचित्र त्यांच्या चित्रकलेचे प्रभुत्व दर्शविणारे आहे, असे हे निसर्गचित्र नाशिक मध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचेच्या मुखपृष्ठावर विराजमान होणार आहे आणि नाशिकच्या गोदातीरावरील नाशिक नगरीचे महान साहित्य परंपरा व सारस्वतांकचे प्रतिनिधित्व करणारे हे बोलके चित्र संमेलनाचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य ठरून स्मरणिकेचे च्या मुखपृष्ठावर नक्कीच चित्रात्मक सौंदर्यपूर्ण गगन वेध घेणारे ठरणार आहे,
चित्रकार राजेश सावंत यांना अनेक कला रसिकांनी सदर चित्रांची गोदा तीरावरील प्रत्यक्ष स्थळी निर्मिती प्रक्रिया कशी झाली आहे हे पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे, त्याकरता चित्रकार राजेश सावंत हे त्यांच्या फेसबुक व इंस्टाग्राम वर सदर चित्राच्या रेखाटना पासून तर चित्रकाराच्या सही पर्यंतचा चित्र निर्मितीचीप्रक्रिया सर्व कला विश्वासाठी, रसिकांच्या आग्रहास्तव त्यांच्या सोशल मीडियावर लवकरच प्रसारित करणार आहेत.
चित्रकार राजेश सावंत- मोबाईल 9766311965