नाशिक – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी अक्षरयात्रा या महामंडळाच्या नियतकालिकामध्ये साहित्य संमेलन आयोजकांच्या हेतू आणि कामकाज पद्धतीबद्दल लेख लिहिला आहे. त्यांच्या या लेखामुळे साहित्य व राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे या लेखात नाशिकच्या संमेलाबाबत आपली भूमिका मांडली आहे. त्यात नाशिकला संमेलन होणार असा निर्णय जाहीर होताच दिल्लीसाठी आग्रही असणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षांनी मला फोन केले, धमक्या दिल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबच नाशिकमधील संमेलन कमी खर्चात आटोपशीर पद्धतीने घ्या असे मी आधीच आयोजकांना सुचविले होते मात्र कोटींच्या घरात जाणारे अंदाजपत्रक बघून मी अस्वस्थ झालो. एवढी गरज काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला आहे. निधी आणि चुकीच्या वाटणाऱ्या कामांबाबत मला भुजबळ यांच्याशी बोलायचे होते. मात्र आयोजक लोकहितवादी मंडळाने तसे होऊ दिले नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर ठाले पाटील यांनी
ज्या तारखांना हे संमेलन घेण्याचे ठरवले होते तोपर्यंत नाशिक शहराने कोरोना संकटाच्या उपद्रवाने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भविष्यात निधीवरुन संभवू शकणाऱ्या चर्चेलाही कारण मिळण्याची शक्यता मावळली आणि सूक्ष्म नजरेच्या जागरुक नाशिककरांच्या तोंडी आणि लेखी तक्रारींतून माझी तसंच साहित्य महामंडळाची सुटका झाल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी आमच्या सूचनांचे आयोजकांनी पालन केले नाही. भुजबळांनी नाशिक जिल्ह्यातील आमदारांशी बोलून आमदार निधीतून संमेलनासाठी मोठी रक्कम मिळवली. मात्र आमदार निधी साहित्य संमेलनासाठी वापरणे योग्य नाही, नाहीतर हे महाराष्ट्र सरकारचे संमेलन होईल. असेही स्पष्ट केले.
या लेखात सविस्तरपणे त्यांनी परखडपणे आपली भूमिका मांडली असून अक्षरयात्रा या नियतकालिकाची पीडीएफ फाईल उपलब्ध झाली आहे. पान क्रं ११ ते २८ या क्रमांकावर हा लेख आहे. वाचकांनी खालील लिंकवर क्लीक करुन हा लेख सविस्तर वाचावा.