बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

चेन्नई क्रिकेट दौऱ्यासाठी नाशिकचा साहिल पारख महाराष्ट्राचा कर्णधार…समकित सुराणा देखील संघात

ऑगस्ट 29, 2025 | 7:52 am
in इतर
0
IMG 20250828 WA0508

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पदार्पणाच्या मालिकेत झंझावाती शतक झळकावलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू ,आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची, १९ वर्षांखालील वयोगटातील महाराष्ट्र संघाच्या चेन्नई दौऱ्यासाठी कर्णधारपदी निवड झाली आहे. त्यासह नाशिकचा अष्टपैलू डावखुरा समकित सुराणा याचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या येत्या नविन सुरु होणाऱ्या २०२५-२६ क्रिकेट हंगामा साठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तयारी सुरु केली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघाच्या सराव सामन्यांसाठी महाराष्ट्र संघ चेन्नई येथे जाणार आहे. या सराव क्रिकेट दौऱ्यासाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी साहिल पारख याची निवड करणात आली आहे. १८ खेळाडूंचा १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघ चेन्नई येथे चार दिवसीय सामने खेळणार आहे.

नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साहिल पारख साकार करत सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना, आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत, केवळ ७५ चेंडूत नाबाद १०९ धावा फटकावत, भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला होता. त्यानंतर मागील २०२४-२५ च्या हंगामात साहिल पारख याची बीसीसीआयच्या विनू मंकड स्पर्धे साठी, १९ वर्षांखालील वयोगटातील महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती .साहिल पारख ६ मे ते १६ मे दरम्यान झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या बेंगळुरू येथे झालेल्या इंटर सेंटर ऑफ एक्सलन्स स्पर्धेत निवडला गेला होता.

भारतभरातील उदयोन्मुख युवा खेळाडूंसाठी बीसीसीआयच्या एनसीए, बेंगळुरू तर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील शिबीरात साहिलची गेल्या सलग ३-४ वर्षांपासून निवड होत आहे. वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. नाशिकचा डावखुरा समकित सुराणा हा उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू असून नुकत्याच संपलेल्या हंगामात १९ वर्षांखालील नाशिक जिल्हा क्रिकेट संघाचे कर्णधार पद भूषवताना राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( एम सी ए इन्विटेशन लीग ) स्पर्धेत फलंदाजी व डावखुरी फिरकी गोलंदाजीत जोरदार कामगिरी केली होती. वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच या दोन नाशिककर खेळाडूंची १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघाच्या चेन्नई दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

साहिल व समकितच्या या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे यांनी दोघांचे अभिनंदन करून स्पर्धेतील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

IMG 20250828 WA0509
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संगमनेरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला…राजकीय वातावरण तापले

Next Post

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश, कोणत्याही सुविधा नाही…रोहित पवार यांचा गंभीर आरोप

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
rohit pawar

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश, कोणत्याही सुविधा नाही...रोहित पवार यांचा गंभीर आरोप

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011