शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात भारताच्या विजयात नाशिकच्या साहिल पारखच्या घणाघाती नाबाद १०९ धावा

by Gautam Sancheti
सप्टेंबर 23, 2024 | 5:35 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 87

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकच्या समस्त क्रीडाप्रेमी व खास करून क्रिकेट रसिकांसाठी जोरदार, अतिशय आनंदाची व अभिमानाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू ,आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना,आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत, केवळ ७५ चेंडूत १४ चौकार व तब्बल ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावत, भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला. यामुळे भारतीय संघाने आता तीन सामन्याच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

साहिल पारख भारतीय संघातर्फे १९ वर्षांखालील वयोगटात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिका खेळत आहे. पुदुचेरी येथे २१ ते २६ सप्टेंबर दरम्यान , १९ वर्षांखालील भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवासीय सामन्यांची मालिका होत आहे. पहिल्या सामन्यात साहिल पारखने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकार मारून पदार्पण केले ,पण लगेचच ४ धावांवर बाद झाला होता. मात्र दुसऱ्याच सामन्यात त्याची जोरदार भरपाई नाबाद घणाघाती आक्रमक फटकेबाज शतक झळकवून केली. साहिलने आज केवळ ४१ चेंडूतच अर्धशतक झळकवले ( ५ चौकार व ३ षटकार ) आणि त्यापुढील फक्त ३४ चेंडूत ५६ धावा फटकावत हा अवघ्या नाशिकचा लाडका सुपुत्र १०९ धावांवर ( एकूण १४ चौकार व ५ षटकार ) नाबाद राहिला. साहिलच्या फलंदाजीचा स्ट्राईक रेट १४५.३३.

त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद १७६ धावा केल्या. महाराष्ट्राच्या किरण चोरमळेच्या गोलंदाजीवर साहिलने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा झेल घेतला व त्यास १५ धावांवरच तंबूत पाठवले. किरण चोरमळेसह, समर्थ एन व मोहम्मद इनाननेही प्रत्येकी २ बळी घेतले. विजयासाठी १७७ धावांचा पाठलाग करतांना साहिलने रुद्र पटेल बरोबर ३ षटकातच २४ धावांची सलामी दिली. रुद्र पटेल १० धावांवर बाद झाला. त्यांनतर साहिलने अभिग्यान कुंडू सह पुढील केवळ १९ षटकांत जोरदार नाबाद १५३ ची विजयी भागीदारी केली . षटकामागे ८ धावांच्या सरासरीने केलेल्या आक्रमक फलंदाजी समोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी नांगी टाकली. १५ षटकातच १२० धावा फलकावर लागल्या त्यात साहिलच्या धावा होत्या ४४ चेंडूत ६३. भारताचा यष्टीरक्षक अभिग्यान कुंडूने साहीलला सुरेख साथ देत ५० चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या .

नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साकार झाले आहे व समस्त क्रीडा रसिकांना पुढील सामन्यातच नव्हे तर भविष्यात देखील साहिल पारख कडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. तिसरा एकदिवसीय सामना २६ सप्टेंबरला आहे. भारतीय संघातील साहिलच्या या अफलातून कामगिरीने नाशिकच्या क्रीडा वर्तुळात, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्ह्यातील सर्व क्रिकेट खेळाडूंत , क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी व सदस्य व संघ प्रशिक्षक या सर्वांनीच नाबाद शतकवीर साहिलचे खास अभिनंदन करून स्पर्धेतील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये अपघाताची मालिका सुरुच…वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

Next Post

तरूणास बेदम मारहाण, वाहनांची तोडफोड…काठेगल्लीतील घटना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
sushila kargi
मुख्य बातमी

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

सप्टेंबर 12, 2025
Next Post
crime1

तरूणास बेदम मारहाण, वाहनांची तोडफोड…काठेगल्लीतील घटना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011