आपली रास धनु आहे का?
२०२३ हे वर्ष असं जाईल
२०२३ या नवीन वर्षाला प्रारंभ झाला आहे. हे वर्ष आपल्याला कसे जाईल, अशी उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यामुळे सर्व बारा राशींच्या व्यक्तींना नवे वर्ष कसे जाणार, याबाबतचा रोज एका राशीचा अंदाज आपण दहा टिप्सच्या स्वरूपात जाणून घेत आहोत. आज आपण धनु या राशीबद्दल माहिती घेऊया…
धनु ही अग्नितत्त्वाची रास आहे. यावर गुरू (ज्योतिष)चा अंमल आहे. ही द्विस्वभावी राशी आहे. ही रास असलेल्या माणसाचा स्वभाव काहीसा संतापी, पण याचवेळी संयमी आणि सात्त्विक असतो. माणसात अध्यात्माची ओढ दिसते. तो आशावादी असतो आणि त्याच्यात परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते. ज्या व्यक्तींच्या नावाचे अद्याक्षर ये, यो, भा, भी, भू, धा, फा, टा, भे असे त्यांची रास धनु असते.
धनु रास
१) धनु राशीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी टॅक्सेशन, आयसीडब्ल्यूए, सीए विविध क्षेत्रातील सल्लागार माध्यम क्षेत्रातील वरिष्ठ पद सचिव अशा पदांसाठी प्रयत्न करावेत…
२) धनु राशीच्या व्यक्तींनी शक्यतो भागीदारी व्यवसाय करू नये. केल्यास जवळच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत करा….
३) विवाह इच्छुकांनी मागील वर्षी ठेवलेल्या जास्तीच्या अपेक्षा मर्यादित करून व्यावहारिक अपेक्षा ठेवाव्यात. जरूर कार्य ठरेल..
४) दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे वर्ष अतिशय चांगले आहे…
५) ऍसिडिटी, पोटदुखीच्या तक्रारी, उचकी लागणे, डोळ्यासमंधातील तक्रारी याकडे दुर्लक्ष नको..
६) कुटुंबांतर्गत व्यवहार सर्वांमध्ये चर्चा करून करावे. गैरसमज होईल असे निर्णय घेऊ नये….
७) अनेक महत्त्वाची रेंगाळलेली कामे नवीन वर्षात पूर्ण होणार आहेत..
८) महिला वर्गांची नोकरीच्या ठिकाणी बढती, व्यवसायात नवीन क्षेत्रामध्ये संधी, दागिने खरेदी याची संधी मिळणार आहे….
९) सामाजिक तसेच राजकारण क्षेत्रातील व्यक्तींनी विश्वासू व्यक्तींना सोबत ठेवावे. क्वांटिटी पेक्षा कॉलिटीला महत्त्व द्यावे..
१०) शक्यतो जुने वाहन खरेदी करू नये. केल्यास केवळ बजेट न बघता तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने घ्यावे..
टीप – वरील टिप्स या धनु राशीसाठी सर्वसमावेशक आहेत. धनु राशीत असलेली मूळ, पूर्वाशाढा, उत्तराशाढा या नक्षत्राप्रमाणे भिन्न तसेच कुंडली पाहून व्यक्तिगत सविस्तर सल्ला दिला जाईल….
महाराष्ट्रभर वास्तु व्हिजिट कॉम्प्युटर कुंडली शुभनवरत्न व्यक्तिगत सविस्तर ज्येष्ठ मार्गदर्शन भवानी ज्योतिष.. पं. दिनेशपंत ..फक्त व्हाट्सअप संपर्क 9373 91 34 84….
सर्व राशीच्या वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा