नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सागरमाला या योजनेअंतर्गत देशामध्ये विविध ठिकाणी ड्रायपोर्ट विकसित केले जात आहेत. या योजनेमध्ये महाराष्ट्रात ४ ठिकाणी ड्रायपोर्ट उभारले जाणार आहे. तशी माहिती केंद्र सरकारने संसदेमध्ये दिली आहे.
सागरमाला कार्यक्रमात लॉजिस्टिक पार्कचे 13 प्रकल्प समाविष्ट आहेत. परिशिष्टात या 13 प्रकल्पांचा तपशील जोडला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, प्रमुख बंदरे आणि राज्य सरकारे यांनी हे प्रकल्प हाती घेतले आहेत. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
भारतमालाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय हे 35 मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क्स विकसित करत आहे. त्यापैकी 6 पार्क हे MoRTH ने कोचीन (केरळ), चेन्नई (तामिळनाडू), विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) मुंबई (महाराष्ट्र), कोलकाता (पश्चिम बंगाल), आणि कांडला (गुजरात) या बंदरांच्या शहरांमध्ये हाती घेतले आहेत. याशिवाय, स्थिर जेटींना निश्चितपणे किफायतशीर आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ पर्याय देऊ शकतील अशा फ्लोटिंग जेटींच्या विकासासाठी मंत्रालयाने देशभरातील 50 ठिकाणे निश्चित केली आहेत.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ग्रामीण विकास मंत्रालयाच्या समन्वयाने किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतला आहे, त्यात 5000 हून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण दिले आहे. विशाखापट्टणम आणि मुंबई येथे मंत्रालयाने सागरी आणि जहाज बांधणी उत्कृष्टता केंद्र स्थापन केले आहे जिथे 6000 हून अधिक उमेदवारांचे प्रशिक्षण झाले आहे.
सागरमालामध्ये समाविष्ट असलेल्या लॉजिस्टिक पार्क प्रकल्पांची यादी खालीलप्रमाणे
प्रकल्पाचे नाव…राज्ये
१ दक्षिण उत्तराखंड मध्ये नवीन ICD विकास -MMLP पंतनगर उत्तराखंड
2 रायपूरमध्ये नवीन आयसीडी विकास -एमएमएलपी नया रायपूर छत्तीसगड
3 झारसुगुडा मध्ये नवीन ICD विकास ओडिशा
4 मल्टी मॉडेल लॉजिस्टिक हबचा दुसरा टप्पा – विशाखापट्टणम बंदर आंध्र प्रदेश
५ हैदराबादमध्ये नवीन आयसीडी विकास -एमएमएलपी नागुलापल्ली तेलंगणा
6 नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील ड्राय पोर्ट महाराष्ट्र
8 सांगली जिल्ह्यातील रांजणी गावात ड्राय पोर्ट महाराष्ट्र
९ राजस्थानमध्ये नवीन ICD विकास – MMLP स्वरूपगंज राजस्थान
10 पारादीप बंदर येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क ओडिशा
11 उत्तर बंगालमध्ये नवीन ICD विकास – दार्जिलिंग पश्चिम बंगाल
12 वर्धा येथे ड्राय पोर्ट महाराष्ट्र
13 जालना येथील ड्राय पोर्ट महाराष्ट्र